Maratha Reservation Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: पैसे नाहीत, सकाळपासून उपाशी आहे ...आम्हाला घरी जायचंय! हिंसक आंदोलनानंतर बीडची बससेवा ठप्प

Maratha Reservation: बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीडमधील बससेवा ठप्प झाली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Reservation

बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीडमधील बससेवा ठप्प झाली आहे. शेकडो बस बसस्थानकातच थांबून असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अनेक प्रवाशी बसस्थानकात तर काही प्रवाशी बसमध्येच अडकून पडले आहेत.

मराठा आरक्षणावर सरकार कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील जालण्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान बीडमध्ये हिंसक वळण लागल्यानंतर रात्री बस पेटवून देण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा एक बस फोडण्यात आली आहे. त्यामुळे बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेकडो बस बसस्थानकात उभ्या आहेत आणि त्यामुळे आता प्रवाशांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्ही आज सकाळी संभाजीनगरवरून बसमध्ये बसलो. मात्र बीड शहरात येण्यापूर्वी रास्ता रोको आंदोलन सुरू होते. त्याठिकाणी बस अर्धा ते पाऊण तास थांबवली. त्यानंतर बीड शहरातील बस स्थानकात आलो. मात्र आता पाच ते सहा तासांपासून इथंच आहोत. खिशात पैसे नाहीत, सकाळपासून उपाशी आहोत, आता आम्ही जायचं कसं ? असा सवाल संभाजीनगरवरून मुखेडला जाणाऱ्या प्रवाशांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

SCROLL FOR NEXT