Manoj Jarange on OBC Andolan Saam TV
महाराष्ट्र

Monoj Jarange News: ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत; मनोज जरांगे यांचा सर्वात मोठा आरोप, काय म्हणाले पाहा VIDEO

Manoj Jarange on OBC Andolan : ओबीसी समाजाचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे, असं मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Satish Daud

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ओबीसी समाजाचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. अचानक काही गोष्टी घडायला लागल्या की लक्षात येतं. अगोदरच्या आणि आताच्या आंदोलनात मोठा फरक आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलकांना भेटायला येणं ही राजकीय नेत्यांची चळवळ आहे. मात्र, आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

उपोषणामुळे तब्येत खालवल्याने मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, "मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे राज्य सरकार अजिबात कोंडीत सापडलं नाही. उलट तेच आंदोलन उभे करीत आहेत. ओबीसींचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे".

"अगोदरच्या आणि आताच्या आंदोलनात खूप मोठा फरक आहे. आंदोलकांना राजकीय नेते टप्प्याटप्याने भेटायला येत आहेत. ही त्यांची चळवळ आहे. मात्र, काहीही घडलं तरी मराठा समाज आता मागे हटणार नाही. आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेऊनच दाखवू", असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांना मी दोष देणार नाही. हे सर्व सरकार घडवून आणत आहे. आमचं उपोषण १७-१७ दिवस सुरू होतं तरीही सरकारने आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. माझी मराठा समाजातील तरुणांना विनंती आहे, की आपल्याला कधी न मिळणारे आरक्षण आता मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका".

"काही दिवसांनी तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. तेव्हा नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न करा. मी आरक्षण मिळवून देणार. आरक्षण मिळाल्यावर इच्छा पूर्ण होणार. नोकरी हुकू द्या तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. काळजी करू नका. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही.पुढील दिवसात तुम्हाला आरक्षण असेल", असं जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT