Maratha Reservation Meeting  
महाराष्ट्र

Maratha Reservation: आरक्षणावरुन जातीचं राजकारण; सर्वपक्षीय बैठकीत गोंधळ, सभागृह तहकूब

Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटलेत. तर याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केलीय. तर जरांगेंनीही सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर , साम प्रतिनिधी

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आणि त्याच मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी विरोधकांवर निशाणा साधला तर त्यावर विजय वडेट्टीवारांनीही जातीयवाद करण्याचं काम महायुती सरकार करत असल्याचा पलटवार केलाय. सत्ताधाऱ्यांच्या गदारोळामुळे सभागृह स्थगित करावं लागलं.

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी आमने-सामने आलेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत आरक्षणाच्या वादावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या बैठकीपुर्वीच विरोधी पक्षाने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला.

विरोधकांच्या बहिष्कारानंतरही सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना विरोधकांनी जातीचे रंग दाखवला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तर लग्नाचं उदाहरण देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही त्यावर उत्तर दिलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात वातावरण तापलेलं असतानाच खुर्ची हिच राजकारण्यांची जात असल्याचं म्हणत जरांगेंनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय.

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा होती. मात्र आता ही शक्यताही मावळलीय. त्यामुळे राज्य जातीय आगीच्या कचाट्यात येण्यापुर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांनी ठोस तोडगा काढून सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Women's health issues: धक्कादायक! ४०% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त; केवळ लाजेमुळे उपचारास होतोय विलंब

Rahul Gandhi : मतचोरांना आयोगाच्या आयुक्तांकडून पाठिंबा, राहुल गांधींचा गंभीर आरोप; CID चे पुरावे दाखवत 'बॉम्ब' फोडला

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Dharashiv : गावाला पुराच्या पाण्याचा वेढा; प्रस्तुत वेदना होणाऱ्या महिलेला पाण्यातून तराफ्यावर काढले बाहेर

SCROLL FOR NEXT