Saam tv
महाराष्ट्र

Rajmata Jijau Jayanti: मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या धर्तीवर जिजाऊंची पूजा करावी : मराठा क्रांती मोर्चा; जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

मुख्य कार्यक्रमास सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

संजय जाधव

Buldhana News :

ज्या प्रमाणे मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करतात, त्याच पद्धतीने सिंदखेड राजा येथे मुख्यमंत्र्यांनी राजमाता जिजाऊ यांची प्रतिवर्षी 12 जानेवारीला पूजा करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे. दरम्यान राजमाता जिजाऊ जन्मोत्सव (rajmata jijau jayanti) सोहळ्याची तयारी सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे अंतिम टप्प्यात आली आहे. (Maharashtra News)

दरवर्षी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा केला जातो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिजाऊ यांचे जन्मस्थळाची मोठी दुरवस्था झाल्याचे साम टीव्हीने समाेर आणले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी जिजाऊ जन्मस्थळास भेट दिली. त्यानंतर त्यांनी पूरात्तव खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

यावेळी डाेंगरे यांनी समृद्धी महामार्गाच्या बाजूला जिजाऊंचे स्मारक तत्काळ पूर्ण करावा, जिजाऊ यांचे जन्मस्थळ ठिकाणी राजे लखुजीराव जाधव यांचा पुतळा बसवावा अशी मागणी केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणारा असल्याचे ही डोंगरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात

दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. यंदा 426 वा जिजाऊ जन्मोत्सवच्या निमित्ताने जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य कार्यक्रमास सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरोषोत्तम खेडेकर हे कार्यक्रमाचे आयोजक आहेत. जिजाऊ सृष्टीवर 231 पुस्तकांचे स्टाॅल उभारण्यात येत आहे.

जिजाऊ सृष्टीवर पार्किंगची व्यवस्था

या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात आली असून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातून लाखो जिजाऊ भक्त 12 जानेवारीला सिंदखेडराजा येथे दाखल होणार असून वाहनाची एकच गर्दी होणार असल्याने जिजाऊ सृष्टीवर एका बाजूला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT