Rasta Roko Andolan News Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: राज्यभरात मराठा समाजाचा रास्ता रोको; जालन्यात समृद्धी महामार्ग अडवला, वाहतुकीला मोठा फटका

Rasta Roko Andolan News: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मराठा आंदोलकांनी थेट मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गअडवला आहे.

Satish Daud

Maratha Community Rasta Roko Andolan

राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. शनिवारपासून (२४ फेब्रुवारी) गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगेंच्या या आवाहनाला राज्यभरातील मराठा समाजाने पाठींबा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा सार्वजनिक वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, जालन्यात संतप्त मराठा आंदोलकांनी थेट मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Samruddhi mahamarg) अडवला आहे.

यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण गावातल्या मराठा समाजाच्या वतीने समृद्धी महामार्गावर आंदोलन सुरू केलं आहे. सकाळी ११ ते १ दरम्यान हे आंदोलन सुरू ठेवणार, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

दरम्यानन, बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या वाहनांना अडवू नका, असं आवाहन जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं होतं. त्यानुसार, मराठा बांधवांकडून विद्यार्थ्यांच्या वाहनांना रास्ता मोकळा करून देण्यात येत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

सकल मराठा समाजाकडून शहरातील हर्सूल टी पॉइंट रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून एक मराठा लाख मराठा घोषणेने परिसर दणाणला आहे. आंदोलनामुळे संभाजीनगर-जळगाव मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.

बीडमध्ये देखील मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलकांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. लातूरमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिस अधीक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT