Manoj jarange patil saam Tv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक; मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार; आंदोलनाची रणनिती ठरणार?

Manoj jarange Patil Meeting: आज (२५, फेब्रुवारी) जरांगे यांनी मराठा बांधवांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची रणनिती ठरण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

Manoj jarange Patil News:

सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 16 वा दिवस आहे. आज (२५, फेब्रुवारी) जरांगे यांनी मराठा बांधवांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची रणनिती ठरण्याची शक्यता आहे.

आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्वांनी हजर राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होईल.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीसंदर्भात माहिती दिली होती. या बैठकीत महत्वाचा आणि अंतिम निर्णय होईल, सरकार काय डाव आखत आहे ते मी लिहून ठेवलयं. सरकारकडून कसे षडयंत्र रचले जात आहे, याबद्दल मी उद्याच्या बैठकीत मी समाजाला सांगणार आहे. काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांचे जुने सहकारी अजय बारसकर यांनी जरांगेविरोधात खळबळजनक वक्तव्ये केली आहेत. यावर जरांगे पाटील काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बारसकर यांनी आज जरांगेंबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचाही दावा केला आहे. त्यामुळे ते आज काय बोलणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

आता 350 रुपयांची नोट चलनात? RBI लवकरच करणार घोषणा?

Head Neck Cancer Symptoms: गिळताना त्रास होतोय? वेळीच व्हा सावध! डोकं अन् मानेच्या कॅन्सची असू शकतात लक्षणे

Railway Mega Block: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन दिवस पॉवर ब्लॉक; पनवेल-बेलापूर ट्रेन बंद; वेळापत्रक वाचा

Laxmichya Paulanni : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट; ईशा केसकरची एक्झिट तर नवीन नायिकेची एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT