Lok Sabha Election 2024: 'लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा जिंकता येणार नाही, प्रशांत किशोर यांचं भाकीत

Prashant Kishor Lok Sabha Elections Prediction: रणनीतीकार आणि जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपले भाकीत केलं आहे. ते
Prashant Kishor Lok Sabha Elections Prediction
Prashant Kishor Lok Sabha Elections PredictionSaam Tv
Published On

Lok Sabha Elections 2024 Prediction:

रणनीतीकार आणि जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपले भाकीत केलं आहे. ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणे खूप कठीण आहे. 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, 'या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र, यावेळी ती पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prashant Kishor Lok Sabha Elections Prediction
Richest Candidate Rajya Sabha: राज्यसभेत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाची आहे सर्वात कमी संपत्ती; जाणून घ्या

या निवडणुकीत काँग्रेस शंभरचा टप्पा ओलांडणार का? असा प्रश्न प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिसत नाही.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, 'जागांची संख्या 50-55 झाली तरी देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Prashant Kishor Lok Sabha Elections Prediction
Lok Sabha elections: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी पूर्ण, पुढील आठवड्यात या दिवशी उमेदवारांची यादी होऊ शकते जाहीर

भाजपच्या 370 जागा जिंकण्याचे लक्ष्याबद्दल विचारले असता किशोर म्हणाले, भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. लोकांनी 370 चे हे लक्ष्य खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला ध्येय निश्चित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर चांगले आहे. जर ते शक्य नसेल तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत नम्रपणे वागले पाहिजे. त्यांच्या मते, 2014 नंतर अशा 8-9 निवडणुका झाल्या ज्यात भाजपला आपले निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com