Richest Candidate Rajya Sabha
Richest Candidate Rajya Sabha Saam Tv

Richest Candidate Rajya Sabha: राज्यसभेत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कोणाची आहे सर्वात कमी संपत्ती; जाणून घ्या

Net Worth Rajya Sabha Candidates: राज्यसभेसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी 15 राज्यांमधील 56 जागांसाठी 59 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
Published on

Rajya Sabha Elections 2023:

राज्यसभेसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी 15 राज्यांमधील 56 जागांसाठी 59 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी 36 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 127.81 कोटी रुपये आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ADR) या निवडणूक अधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली. एडीआर आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ने या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Richest Candidate Rajya Sabha
Lok Sabha elections: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी पूर्ण, पुढील आठवड्यात या दिवशी उमेदवारांची यादी होऊ शकते जाहीर

36 टक्के उमेदवारांवर फौजदारी आरोप

राज्यसभा उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण केले असता असे आढळून आले की, 36 टक्के उमेदवारांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं आहे. याव्यतिरिक्त यापैकी 17 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हेगारी आरोप आहेत आणि एका उमेदवारावर खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित खटला सुरु आहे.  (Latest Marathi News)

विश्लेषणानुसार, भाजपचे 30 पैकी आठ उमेदवार, काँग्रेसचे नऊ पैकी सहा उमेदवार, तृणमूल काँग्रेसचे चारपैकी एक उमेदवार, समाजवादी पक्षाचे तीनपैकी दोन उमेदवार, वायएसआरसीपीचे तीनपैकी एक उमेदवार, आरजेडीचा एक उमेदवार, बीजेडीच्या दोन उमेदवारांनी आणि बीआरएसच्या एका उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे.

Richest Candidate Rajya Sabha
Mumbai Railway Stations: मुंबईतील 20 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट, कोणत्या स्टेशनचा आहे समावेश? पाहा लिस्ट

अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती

विश्लेषणामध्ये उमेदवारांची आर्थिक पार्श्वभूमी देखील तपासण्यात आली. सुमारे 21 टक्के उमेदवार अब्जाधीश आहेत. त्यांची संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे. राज्यसभेच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती 127.81 कोटी रुपये आहे. हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांची एकूण संपत्ती 1,872 कोटी रुपये, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे उमेदवार जया अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 1,578 कोटी रुपये आणि कर्नाटकातील जनता दल उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांची एकूण संपत्ती 871 कोटी रुपये आहे.

बालयोगी उमेश नाथ यांची संपत्ती सर्वात कमी

विश्लेषणानुसार, सर्वात कमी संपत्ती असलेले उमेदवार मध्य प्रदेशातील भाजपचे उमेदवार बालयोगी उमेश नाथ आहेत. ज्यांची संपत्ती 47 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच पश्चिम बंगालमधील भाजप उमेदवार समिक भट्टाचार्य यांच्याकडे एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर उत्तर प्रदेशातील भाजप उमेदवार संगीता यांच्याकडे एक कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com