Rain
RainSaamTv

Maharashtra Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसचा अंदाज, या जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट

Maharashtra Rain News : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
Published on

Weather News Update :

राज्यात सध्या ऊन आणि गारव्याचा खेळ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. तर राज्यात देखील आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भ, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. त्यामुळेच पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Rain
Mumbai News : मुंबईत १ मार्चपासून १० टक्के पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता

कोणत्या जिल्ह्यात पावसाचा शक्यता?

मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

Rain
Mahanand Dairy: महानंद डेअरीवरून सासऱ्यात आणि जावयात जुंपली; बाळासाहेब थोरातांची सरकारवर टीका मात्र..

देशातील हवामान

भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( IMD ) दिलेल्या माहितीनुसार , रविवारी पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशात जोरदार वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता आहे. २६ फेब्रुवारीला छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com