Mumbai News : मुंबईत १ मार्चपासून १० टक्के पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता

Mumbai Water Cut News : मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही धरणांत केवळ ४५.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीकपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai News
Mumbai News Saam TV
Published On

Mumbai News :

राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची मोठी समस्या भासू लागली आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांसमोर आहे. मुंबईतील नागरिकांनाही येत्या काळात पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण १ मार्चपासून मुंबईभर १० टक्के पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही धरणांत केवळ ४५.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उर्ध्व वैतरणातील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली गेली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai News
Lok Sabha Election 2024: 'लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा जिंकता येणार नाही, प्रशांत किशोर यांचं भाकीत

मात्र १० दिवस उलटूनही सरकारने प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पाणीकपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

Mumbai News
Goregaon Film City Incident: गोरेगाव फिल्म सिटीत भिंत कोसळली; २ कामगारांचा जागीच मृत्यू, एक जखमी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत मिळून ६ लाख ५७ हजार ५४६ दशलक्ष लिटर म्हणजेच ४५.४३ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com