Ajay maharaj baraskar : 'मी महाराज आणि वकीलही...'; जरांगेंच्या आरोपानंतर बारस्करांनी भरपत्रकार परिषदेत 'ती' रेकॉर्डिंग ऐकवली

Ajay maharaj baraskar News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्यु्त्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये अपमान केल्यानंतर कोअर कमिटीने माफी मागितल्याचा दावा बारस्करांनी केला.
Ajay maharaj baraskar
Ajay maharaj baraskar Saam tv
Published On

Ajay maharaj baraskar Latest News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्यु्त्तर दिलं आहे. तसेच मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये अपमान केल्यानंतर कोअर कमिटीने माफी मागितल्याचा दावा बारस्करांनी केला. मी महाराज आणि वकीलही आहे, असं सांगत कोअर कमिटीने फोनवरून माफी मागितल्याची कॉल रेकॉर्डिंग भरपत्रकार परिषदेत ऐकवली. (Latest Marathi News)

अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. अंतरवालीत जरांगेंनी माझा अपमान केल्याचा दावा करत म्हटलं की, 'मी पण मराठा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझीही इच्छा आहे. अपमान करताना जरांगे पाटलांच्या कोर कमिटीही तिथे होती. त्यांनाही ते सहन झालं नसावं. जरांगेंनी संतांचा व माझा अपमान केल्यानंतर कोअर कमिटीने फोनवरून माफी मागितली. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajay maharaj baraskar
Nitin Gadkari : 'मी आमदार असताना...'; नितीन गडकरींना सांगितला मॉइल हॉस्पिटलचा 'तो' जुना किस्सा

'हा फोन डॉ.तारक, श्रीरामभाऊ, संजूभाऊ यांचा होता. मला शंका आल्यावर मी पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. मला त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा बोलावलं. मी पुन्हा अपमान गिळून गेलो. आमची सगळी टीम गेली होती. जरांगेंचा जीव वाचावा म्हणून आम्ही विनंती करत होतो. त्या ठिकाणी झालेल्या बैठकीचेही पुरावे माझाकडे आहेत. मी योग्यवेळी पुरावे सादर करेल, असेही त्यांनी सांगितले.

Ajay maharaj baraskar
Manoj Jarange Patil News | राज्यात सगळीकडे आज रास्तारोको होणार - जरांगे!| Marathi News

जरांगे यांचा अभ्यास कमी : अजय महाराज बारस्कर

अजय महाराज बारसकर म्हणाले,'मी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. मी व्यक्तिगत आरोप केले नाही. मराठा आरक्षणाबाबत प्रश्न होते. मात्र जरांगे पाटील हे वारंवार पलटी मारत होते. जरांगे पाटील यांचा अभ्यास कमी आहे. कायद्याचं ज्ञान नाही. एका कुटुंबाला जरांगेंच्या सूचनेमुळे केलेल्या आंदोलनामुळे तुरुंगात जावे लागले. जरांगे पाटील यांचा स्वभाव हा अहंकारी आहे. त्यांच्या मी पणा यावर मी बोट ठेवलं. जरांगे पाटील यांनी माझा प्रश्नावर काय उत्तर दिले, तर त्यांनी माझ्यावर बलात्कार व विनयभंगाचे आरोप केले'.

Ajay maharaj baraskar
Manoj jarange Patil: 'गृहमंत्र्यांचे ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल...' मनोज जरांगेंचा थेट इशारा; उद्या घेणार मोठा निर्णय

'जरांगे यांच्याकडे माझ्या प्रश्नाची उत्तरे नाही, त्यामुळे माझ्यावर आरोप केले. मी ३०० कोटींची मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला, तसेच मी ४० लाख घेतल्याचाही आरोप केला. एखाद्या माणसावर या पूर्वी एकही आरोप नाही. माझं जाहीर आवाहन आहे की, जरांगेंनी केलेल्या आरोपानुसार माझी ३०० कोटींची मालमत्ता आहे तर मी ४० लाख का घेईन? या आंदोलनात जरांगे पाटील यांनी मला बोलावले. माझ्याकडे तसाही पुरावा आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com