मी समाजाला मायबाप मानतो.मी एक इंचही मागे हटणार नाही, देवापेक्षा मी समाजाला कमी मानत नाही. राक्षसाला हरवणार म्हणजे हरवणार. राक्षस म्हणजे सरकार का हे उद्या सांगेन. मराठा समाज तुम्हाला किड्या मुंग्या सारख चिरडून पुढे जाईल. बावरसकर सारख्या भंगार लोकांबद्दल मी बोलायला तयार नाही. जेव्हा त्याच्यावर वेळ येईल तेव्हा त्याला कळेल. त्यावर बोलायला माझ्या समाजात खूप लोक आहेत, असं उत्तर मनोज जरांगेंनी बारसकर यांना दिलंय. (Latest News)
आज ठरल्याप्रमाणे मराठा समाजाने शक्ती दाखवलेली आहे. जाणूनबुजून लोक गुंतवले जाऊ नये, म्हणून ठराविक लोक आंदोलनात उतरले बदनापूरमध्ये का लाठीचार्ज केला. याची आज संध्याकाळी चर्चा होईल. सगळी माहिती मला मिळेल. आता रास्ता रोकोचे धरणे आंदोलनात रुपांतर होत आहे. उद्या अंतरवालीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सगळ्यांनी उद्या रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत यावे,असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले. प्रशासनाकडून विनाकारण गुन्हे दाखल केले जाणार अशी माहिती आहे शांततेत आंदोलन असताना वरून प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याची महिटी मिळाली उद्या मी यावर बोलणार असल्याचं जरांगे म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सगळ्यांनी या बैठकीला येऊन समाजाला पुढची दिशा कशी द्यायची म्हणून उद्या निर्णायक बैठक होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. इथे कुणीही कोअर कमिटी नाही समाज आहे. मी कामातून उत्तर देईन. समाज समभ्रमित होणार नाही.मी आरोप करणाऱ्याला उत्तर देणार नाही.कामातून उत्तर देईन.
दरम्यान आज अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेत जरांगेंवर गंभीर आरोप केले. “मनोज जरांगे यांच्यापासून आंदोलन सुरू होतं आणि त्यांच्यापासून संपतो. तोच मेन नेता आहे. दुसरा-तिसरा प्रवक्ता तुम्ही पाहिला का? जरांगे पाटील यांच्या वतीने कुठला वकील, अभ्यासक पाहिला का? जरांगे पाटील यांच्या तोंडून कुणाचं नाव ऐकलं का? टीमवर्कचा पत्ताच नाही. दिवसाला तत्वज्ञान बदलत आहे. माझी मागणी आहे की, मी बलात्कार केल्याचा आरोप जरांगेंनी केला. मी विनयभंग केला असेल तर त्या महिला समोर आणून दाखव, असं आव्हान बारसकर यांनी मनोज जरांगे यांना दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.