Manoj Jarange Patil Maratha Aarkshan News:  Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: आरक्षणासाठी एल्गार! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज बीड, धाराशिव जिल्हा बंद; रविवारी पुणे, परभणी 'जिल्हा बंद'ची हाक

Maratha Aarkshan Beed Dharashiv Jilha Band: एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले असतानाच राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Manoj Jarange Patil Hunger Strike Protest: सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी तसेच मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत. मनोज जरांगेच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून कालपासून त्यांची प्रकृती खालावली होती. एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले असतानाच राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

जरांगेंच्या समर्थनार्थ 'बीड' बंद!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मागील 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता बीड जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे. आजचा बीड बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयकांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने अंतरवलीत दाखल व्हावं, असं देखील आवाहन करण्यात आले आहे.

धाराशिवमध्येही कडकडीत बंद...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे, तरीही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असुन सर्वांनी शांततेत बंद पाळावा अस आवाहन शनिवारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल होते.त्यामुळे सकाळपासून शहरात शुकशुकाट पाहायला मिळत असुन बहुतांश भागात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दुपार नंतर मराठा बांधव आंतरवली सराटीकडे जाणार आहेत अस देखील मराठा बांधवांनी सांगितले.

उद्या, पुणे परभणी जिल्हा बंद!

मनोज जरांगे यांच्या यांच्या सुरु असलेल्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणास समर्थन देण्यासाठी उद्या रविवारी अखंड मराठा समाजाच्या वतीने परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे उपस्थित रहावे असे आव्हान सकल मराठा समाज परभणी जिल्हा वतीने करण्यात आले आहे.

तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रविवार दिनांक 22 तारखेला मराठा समाजाने पुणे जिल्हा, तसेच जालन्यातही बंदची हाक दिली आहे. ⁠पुणे जिल्हा बंद करून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT