Maratha protest at Azad Maidan in Mumbai while OBC leaders gather under Chhagan Bhujbal’s leadership. saamtv
महाराष्ट्र

OBC Leader Meeting: राज्यातील राजकीय वातावरण तापणार; मुंबईत एकीकडे मराठा आंदोलन, दुसरीकडे OBC नेत्यांची बैठक

OBC Leaders Meeting In Mumbai : मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू ठेवल्याने महाराष्ट्रात तणाव वाढलाय. तर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांची बैठक सुरूय.

Bharat Jadhav

  • मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.

  • ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, मराठा समाजाची मागणी

  • छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झाली आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलन चालूय. दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेच्या मागणीला विरोध दर्शवला असून, आज मुंबईत छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक सुरूय.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून आज मुंबईत राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू होतेय. या बैठकीला समीर भुजबळ, पंकज भुजबळ, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह लक्ष्मण गायकवाड, स्नेहा सोनटक्के, सत्संग मुंढे,धनराज गुट्टे, दौलत शितोळे, नवनाथ वाघमारे, दशरथ पाटील, दिलीप खैरे, समाधान जेजुरकर यांसह इतर प्रमुख नेते उपस्थित आहेत.

या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी रणनीती ठरवली जाणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेत मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या मागणीला विरोध करावा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केलीय. मनोज जरांगेंच्या मागणीबाबत महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. महायुती आणि विद्यमान सरकारनेही आपली भूमिका कायम ठेवली पाहिजे. ओबीसी मतांवर राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी केलीय.

असे लाड झाले तर...; हाकेंची जरांगेवर टीका

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीका केलीय. मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलकांवरही हाके यांनी निशाणा साधाला. 'मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये, हेच आम्ही सांगत होतो. त्यात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची लोक आहेत. जर असे लाड झाले तर कुणीही येईल आणि धुडगुस घालेल. मुंबईकर, महिला, पत्रकार सुरक्षित नाहीत. राज्य सरकारने जरांगे यांना थांबवायला हवं'.

'ज्या लोकप्रतिनिधींनी मनोज जरागेंच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी. बोगस कुणबी होऊन शिरकाव करत असेल तर ते खपवून घेणार नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरागें पाटील यांना महत्त्व देऊ नये. मुंबई वेठीस धरता येणार नाही. आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ नये, असेही हाके जरांगेंवर टीका करताना म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT