Maratha Arakshan Andolan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Arakshan Andolan: मराठा आमदार-खासदारांना आंदोलकांची श्रद्धांजली, महाराष्ट्रात कुठे-कुठे आंदोलन?

Maratha Arakshan Andolan: मराठा आमदार-खासदारांना आंदोलकांची श्रद्धांजली, महाराष्ट्रात कुठे-कुठे आंदोलन?

Rajesh Sonwane

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणावरून राज्यभरात जोरदार आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) घेवूनच राहणार या मागणीवर मराठा समाज ठाम आहे. याकरिता अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाली. तर काही ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. आज देखील राज्यभरात आंदोलन करण्यात आली. (Maharashtra News)

लातूर जाहीराबाद महामार्गावर रास्ता रोको

गेल्या पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात जालना घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहेत. आज लातूर (Latur) जिल्ह्यातल्या शेरा येथे युवकांनी गावात टायर जाळत निषेध केला. तसेच लातूर जाहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरुद्ध घोषणा देत आरक्षणाची मागणी करण्यात आली.

हिंजवडी परिसर ग्रामस्थांनी बंद

पिंपरी चिंचवड : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आज माण आणि हिंजवडी परिसर ग्रामस्थांनी बंद ठेवला आहे. आयटी परिसरात दिवसभर रुग्णालय, क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिकांनी स्वतःहुन दुकाने बंद ठेवत निषेध आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने काहीकाळ वाहतूक देखील ठप्प झाली होती.

मराठा आमदार - खासदारांना वाहिली श्रद्धांजली

नांदेड : मराठा आरक्षणाच्या विषयावर गप्प असणाऱ्या आमदार आणि खासदारांना नांदेडमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. मारतळा गावात आंदोलकांनी एकत्र येत मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांनी पदाचे राजीनामे देऊन (Jalna News) आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जे आरक्षण आंदोलनात सहभागी होणार नाहीत त्यांना आम्ही समाज बांधव म्हणणार नाही अशी भूमिका मारतळा गावातील आंदोलकांनी घेतली.

नवी मुंबईत लाक्षणिक उपोषण

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात नवी मुंबई मराठा समाजाच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातर्फे हे उपोषण करण्यात आले. आरक्षण मिळावे, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्यावे आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हे उपोषण करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT