Gondia News: जिल्ह्यातील पाचच प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा; पावसाची नितांत गरज

जिल्ह्यातील पाचच प्रकल्प भरले १०० टक्के; पावसाची नितांत गरज
Gondia News
Gondia NewsSaam tv

शुभम देशमुख 
गोंदिया
: राज्यात कोठेही पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे नद्या देखील यंदा कोरड्याच आहेत. परिणामी धरणातील पाणी साठा देखील कमीच आहे. हीच परिस्थिती (Gondia) गोंदिया जिल्ह्यात पहावयास मिळाली (Rain) आहे. गोंदिया जिल्ह्यात असलेल्या ३२ मध्यम व लघु प्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ पाच प्रकल्पच फुल्ल झाले आहेत. मात्र इतर प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Tajya Batmya)

Gondia News
Jalna News : मराठा आरक्षणासाठी महामार्ग रस्ता रोको; जालन्यातील लाठीचार्जचा केला निषेध

पावसाचे यंदा उशिराने आगमन झाले. यानंतर राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. परंतु मागील २०-२५ दिवसांपासून पावसाने ओढ दिली असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैत चांगला पाऊस झाला. या पावसाने काही धरणातील पाणी साठा वाढला. आजच्या स्थितीला गोंदिया जिल्ह्यातील गुमडोह प्रकल्पात ३४.५३ टक्के, कालीमाटी प्रकल्पात २०.८४ टक्के, रेहारी प्रकल्पात ३७.९९ टक्के, सोनेगाव प्रकल्पात २८.६७ टक्के, सालेगाव प्रकल्पात २८.३५ टक्के व ओवारा प्रकल्पात ४९.५७ टक्के पाणी साठा आहे.  

Gondia News
Nandurbar News : ७६ वर्ष उलटले तरी पोहचली नाही वीज; जिल्ह्यातील २८ गावात अजूनही अंधार

पावसाची गरज 

पावसामुळे नद्या, कालवे, प्रकल्पांमध्ये पाणी जमा झाले. मात्र ऑगस्ट महिन्यात काहीसा पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला. परिणामी प्रकल्पांना पाणी मिळाले नाही. पावसाळा अंतिम टप्प्यात आला आहे. किमान या कालावधीत तरी चांगल्या पावसाची गरज आहे. जेणेकरून प्रकल्प पाण्याने भरतील व  आगामी काळातील पाण्याचा प्रश्न सुटेल. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com