Nandurbar News : ७६ वर्ष उलटले तरी पोहचली नाही वीज; जिल्ह्यातील २८ गावात अजूनही अंधार

Nandurbar News : ७६ वर्ष उलटले तरी पोहचली नाही वीज; जिल्ह्यातील २८ गावात अजूनही अंधार
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : एकीकडे देश प्रगती करत आहे. तर आजही दुर्गम भागात सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याचे उत्तम उदाहरण (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. कारण स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जिल्ह्यातील २८ गावांमध्ये अद्याप वीज पोहचलेली नाही. (Live Marathi News)

Nandurbar News
Shirdi MIDC: साईनगरी आता होणार उद्योगनगरी; राज्य सरकारकडून शिर्डी एमआयडीसीची घोषणा

भारताला स्वातंत्र होऊन ७६ वर्ष उलटले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील २८ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. धडगाव तालुक्यातील (Narmda River) नर्मदा काठावरील २६ गावातील कुटुंबांना वीज मिळाली नाही आहे. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. आजही या गावांतील घरांमध्ये दिवा लावावा लागत आहे.  

Nandurbar News
Jalna News : मराठा आरक्षणासाठी महामार्ग रस्ता रोको; जालन्यातील लाठीचार्जचा केला निषेध

लोकप्रतिनिधी नंतर फिरकेना 

निवडणुका आल्या कि गावातील लोकांसमोर मोठमोठ्या घोषणा देऊन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतसाठी मतदान करून घेतात व निवडून येतात. परंतु निवडून आल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधी सुविधा पुरविण्यास पुढे येत नाही. या गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांकडे कोण लक्ष देईल असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com