Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ठणठणीत, ३ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

Manoj Jarange discharged from hospital : मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, आम्ही थंड होत नसतो. सरकारने थांबायला सांगितले आहे. तुमच्या लोकांना थांबवा ते खूप फडफड करत आहेत.

प्रविण वाकचौरे

Manoj Jarange Patil News :

मनोज जरांगे पाटील यांना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी ( २५ नोव्हेंबर) रात्री मनोज जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

राज्यभर दौरे, विविध ठिकाणी सभा आणि सततचा प्रवास यामुळे मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळांवर निशाणा

मनोज जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर येताना मराठा बांधवांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. मी स्वागताला जेसीबी लावू नका, असे सांगत होतो. मात्र समाजाचे प्रेम आहे. फुले टाकू नका सांगितले तरी टाकतात. समाज मला जीव लावत आहे. तुमच्यावर का कोण फुले टाकतील, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.

आम्ही थंड होत नसतो

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, आम्ही थंड होत नसतो. सरकारने थांबायला सांगितले आहे. तुमच्या लोकांना थांबवा ते खूप फडफड करत आहेत. आम्ही सबुरीने घेण्याचा सल्ला ऐकतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

शेतकरी अडचणीत आहे, त्यांना मदत द्या

राज्यातील शेतकरी  अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यात जात पाहणार नाही. शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत.सरकारला हात जोडून विनंती आहे, तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, असं जरांगे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT