Manoj Jarange Patil warns Ajit Pawar not to protect Dhananjay Munde; political tension rises in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Manoj Jarange Warn Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगलाय. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वत: जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर केलाय.

Bharat Jadhav

नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकासाठी राष्ट्रवादी पक्षानं प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली. यात धनंजय मुंडे यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीथेट अजित पवार यांना इशारा दिलाय. अजित पवार यांनी त्यांना पांघरून घालायची गरज नाही. धनंजय मुंडे यांना नार्को टेस्टला पाठवायचं नाहीतर २०२९ ला दाखवतो, असा इशारा त्यांनी अजित पवार यांना दिलाय.

जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत घेत त्यांनी धनंजय मुंडेंना नार्को टेस्ट करण्यासाठी यावे असं आवाहन जरांगेंनी केलं होतं. त्यानंतर जरांगेंनी अजित पवारांना इशारा देत २०२९ मध्ये त्याचा परिणाम भोगावा लागेल असं म्हटलंय. जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

पत्रकार परिषदेत घेत त्यांनी धनंजय मुंडेंना नार्को टेस्ट करण्यासाठी यावे ,असं आवाहन जरांगेंनी केलं होतं. त्यानंतर जरांगेंनी अजित पवारांना इशारा देत २०२९ मध्ये परिणाम भोगावे लागतील असं म्हटलंय. श्री क्षेत्र नारायण गड यांच्यावतीने मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांना देखील इशारा दिला. अजित पवार यांनी आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली. तुम्ही तुमचे राजकारण करा मोठे व्हा. मात्र समाजाला त्रास देऊ नका. पण तुम्ही अन्याय केला तर मी तुम्हाला सोडणार नाही, असं जरांगे म्हणालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक बनविण्यात आले आहे. त्यासंदर्भाने मनोज जरांगे यांना प्रश्न करण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना डोनाल्ड ट्रम्पसोबत पाठवलं तरी मला हरकत नाही. मात्र त्यांना आधी तपासणीसाठी पाठवावे.

जर असं कोणी अजितदादा यांच्या मुलावर घातपात केला असता तर ते गप्प बसले असते का? त्यामुळे ते धनंजय मुंडे यांच्यावर पांघरूण का घालता असा सवालही जरांगेंनी विचारला आहे. 2029 ला याचा पश्चाताप होईल. मागील निवडणूक आठवा, तुमच्या तोंडाचे पाणी पळाले होतं हे मी माध्यमांसमोर बोलेल, त्याला पाठवा नाही तर 2029 ला तुमची फजिती होईल,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT