राजकीय समीकरणं बदलली, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? VIDEO

Political Equations Change: पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार आणि शरद पवार गटांमध्ये चर्चांना वेग आला असून, विजय शिवतारे यांनीही एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : कोल्हापूर येथील चंदगडनंतर आता पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेतही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेजुरी नगरपरिषदेत सध्या या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जेजुरी नगरपरिषदेत एकूण २० जागा आणि एक नगराध्यक्ष पद आहे. यापूर्वी या नगरपरिषदेत माजी आमदार संजय जगताप यांच्या गटाचे वर्चस्व होते. तेव्हा संजय जगताप काँग्रेसमध्ये होते. मात्र सध्या ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या निवडणुकीत संजय जगताप गटाने विजय मिळवला होता, तर त्यावेळी त्यांचा सामना माजी आमदार विजय शिवतारे यांच्याशी झाला होता. त्यानंतरच्या काळात राजकीय गणितात मोठे बदल झाले असून त्यामुळे जेजुरी नगरपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विजय शिवतारे यांनी अजित पवार गटाला जेजुरी नगरपरिषदेत एकत्रित लढण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com