Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Manoj Jarange Patil Latest News : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार आहेत. नारायणगडावर होणाऱ्या सभेत कर्जमाफी, ओला दुष्काळ मदत यावर बोलण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Dussehra rally live updates : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारला घेरणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतली होती. आता त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आता देवेंद्र फडणवीस सरकारला जाब विचारणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या संभाजीनगरमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज ते बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्याला जाणार आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. (Will Manoj Jarange announce farmers’ loan waiver in Maharashtra)

दसरा मेळावा-विजया दशमीच्या राज्यातील सर्वांना शुभेच्छा देतानाच मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांनी लढणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. नारायण गडावर जाऊन दर्शन घेणार आहे. मला जास्त बोलता येत नाही. मंदिरात जाऊन पूजन करणार आणि परत येणार आहे. मला उभे राहता येत नाही. मी भाषण करणार की नाही, हे सांगता येत नाही. तिथे मंदिरात बसून चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांसाठी लढ्याची घोषणा तिथे करणार आहे. वेळ प्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, शेतकऱ्यांसाठी फक्त मी लढ्याची घोषणा करणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी जीआर निघाला आहे. मागील ७० वर्षांतील सर्वात मोठा फायदा झाला आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना देखील आरक्षणात घालणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल एवढी मोठी घोषणा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी की पूरग्रस्तांना सरसकट मदत.. मनोज जरांगे पाटील कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा असा इशारा द्यावा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील १२ वाजता संबोधित करणार, महंत शिवाजी महाराज यांची माहिती

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये आज नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे. मनोज जरांगे पाटील बारा वाजता नारायणगडावरून समाज बांधवांना संबोधित करणार असल्याची माहिती गडाचे महंत शिवाजी महाराजांनी दिली आहे. नारायण गड हा सर्व समाजाचा गड असून वाईट विचारांचे दहन करून चांगले विचार सोबत घेऊन आज गडावरून जायचं आहे. त्याचबरोबर सर्व समाज बांधवांनी सामाजिक सलोखा राखला पाहिजे, असेही आवाहन नारायण गडावरून महंत शिवाजी महाराजांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Massage Parlour Fraud : मसाजाच्या हौसेने वकिलाचे खाते झालं रिकामं, नग्न अवस्थेत व्हिडिओ काढून लुबाडलं, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Pune : पुण्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक, खंडणी प्रकरणात मोठी कारवाई

Ranapati Shivray Swari Agra: 'रणपति शिवराय- स्वारी आग्रा'; शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Chanakya Niti: नवरा-बायकोने या ३ गोष्टी लक्षात ठेवा, संसार होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT