New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

New Nagpur–Chandrapur Expressway Announced : नागपूर ते चंद्रपूर २०४ किमी चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा खर्च २३५३.३९ कोटी रुपये असून, भूसंपादन प्रक्रियाही सुरू होणार आहे.
Nagpur to Chandrapur Expressway Approved
Nagpur to Chandrapur Expressway ApprovedSaam TV Marathi News
Published On

Nagpur to Chandrapur Expressway Approved : नागपूर-मुंबई समृद्धी महमार्ग सुरू झालाय, नागपूर-गोवा हा शक्तिपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर नागपूरमधून आणखी एक महामार्ग तयार होणार आहे. त्यासाठी फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे. हा २०४ किमीचा माहामार्ग चंग्रपूरपर्यंत असेल. भूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटींचा खर्च असेल, असा अंदाज आहे. या महामार्गाच्या निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. लवकरच नागपूर आणि चंद्रपूर या दोन शहरामधील अंतर आणखी कमी होणार आहे. (Nagpur to Chandrapur 204 km highway project approved)

नागपूर ते चंद्रपूर या २०४ किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

Nagpur to Chandrapur Expressway Approved
Gopichand Padalkar Controversy : फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर बेताल,जयंत पाटलांवर पुन्हा खालच्या पातळीवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यामध्ये कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची ' इकोसिस्टीम' निर्माण करण्यात यावी. त्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देशही दिले. नागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत या महामार्गाची लांबी वाढवण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

Nagpur to Chandrapur Expressway Approved
कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, पुण्यात म्हशीच्या पोटी रानगव्याचं रेडकू | VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकासाचे प्रकल्प पूर्ण करताना कालमर्यादेचे बंधन असावे. प्रकल्प रेंगाळला किंवा विलंब झाल्यास किंमत वाढीमुळे विनाकारण राज्यावर आर्थिक भुर्दंड बसत असतो. सध्या राज्यात १० लाख कोटींच्या पायाभूत सोयी - सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांच्या प्रगतीची गती कुठेही कमी पडू देऊ नये. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे नियोजनबद्ध विहित कालमर्यादेत पूर्ण करावी.

Nagpur to Chandrapur Expressway Approved
अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी :-

नागपूर ते चंद्रपूर चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण महामार्ग, लांबी २०४ किलोमीटर, चंद्रपूर शहराला जोड रस्ता ११ किलोमीटर, भूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी.

नागपूर ते गोंदिया १६२ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती महामार्ग, भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू. अंदाजित किंमत १८,५३९ कोटी.

भंडारा ते गडचिरोली चार पदरी द्रुतगती महामार्ग, लांबी ९४ किलोमीटर, अंदाजित रक्कम दहा हजार २९८ कोटी.भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवाने घेण्याची प्रक्रिया सुरू.

Nagpur to Chandrapur Expressway Approved
७५ व्या वर्षी ३५ वर्षाच्या मुलीसोबत विवाह, लग्नाची पहिली रात्र उलटताच वृद्धाचा मृ्त्यू, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com