अक्षय शिंदे, जालना|ता. २५ सप्टेंबर
Laxman Hake Hunger Strike Protest: मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीला विरोध करत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे सुरु असलेल्या या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. या उपोषण स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. अशातच मध्यरात्री काही तरुण उपोषणस्थळी आले होते, त्यांचा काय हेतू होता ते तपासावे असे म्हणत पोलीस संरक्षण असतानाही मराठा तरुण कसे येतात? असा सवाल करत आमच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप दोन्ही उपोषणकर्त्यांनी केला आहे.
आज आमच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मध्यरात्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक भेटायला आले होते, मात्र शिष्ठमंडळ अद्याप आलं नाही. मध्यरात्री चार तरुण आमच्या आंदोलन स्थळी आले. त्यांचा काय उद्देश होता? हे तपासावे. जरांगे पाटलांचे चेले वाळूचा धंदा करतात, त्यांच्या एका समर्थकाने येऊन आम्हाला धमकी दिली. दोन नंबरचे धंदे करणारे शिंदे आणि मनोज जरांगेंचे चेले आहेत, आमच्या अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेणार आहेत. असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. तसेच आमच्या जिवाला धोका आहे. आजूबाजूला पोलीस सुरक्षा असताना ही लोक आमच्याकडे येतात कसे काय? त्यांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे?" असा सवालही त्यांनी यावेळी केला.
"राजेश टोपे हे शरद पवारांचे चेले आहेत. टोपे हे सेक्युलर वादी असल्यामुळे ते मनोज जरांगेंना भेटले. पृथ्वीराज चव्हाणांनी एकदा महाराष्ट्र भ्रमण करावे, महाराष्ट्रात अनेक ओबीसी लोक आहेत ते कधी तुम्हाला दिसले का? राहुल गांधींनी पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षातून काढून टाकावे अन्यथा पक्षाचे नुकसान होईल. तसेच संभाजी भोसले छत्रपती संभाजी राजे यांना आता आम्ही राजा म्हणणार नाही. त्यांनी कितीही शिव्या दिल्या जीव घेतल्या गोळ्या घातल्या तरी आम्ही आता त्यांना राजा म्हणणार नाही," असे म्हणत मविआच्या नेत्यांवरही हाके यांनी निशाणा साधला.
"मध्यरात्री एकच्या सुमारास काही तरुण आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. तो हल्ला मी परतून लावला. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाच प्रसाद देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. वडीगोद्रीत पोलिसांवर दबाव सुरू आहे. मुख्यमंत्री आणि शंभुराज देसाई हे दबाव टाकत आहेत. जरांगे हा उपोषण करता नाही तो निव्वळ नौटंकी बाज माणूस आहे. समाजाला भावनिक करायचं आठ दिवसात त्याने आठ सलाईन घेतले आहे. जरांगे हा नाटके कंपनी आहे," अशी टीका नवनाथ वाघमारे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.