Maratha- OBC वाद पेटण्याची शक्यता; लक्ष्मण हाकेंनी फालतू बडबड बंद करावी अन्यथा.., संभाजी ब्रिगेडचा इशारा

Sambhaji Brigade On Maratha- OBC: संभाजी बिग्रेडकडून लक्ष्मण हाके यांना चर्चेचं आव्हान देण्यात आलंय. तसेच त्यांनी वायफळ बडबड करू नये असं देखील सांगण्यात आलंय.

Maratha- OBC वाद पेटण्याची शक्यता; लक्ष्मण हाकेंनी फालतू बडबड बंद करावी अन्यथा.., संभाजी ब्रिगेडचा इशारा
Sambhaji Brigade On Maratha- OBCSaam Tv
Published On

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर संभाजी ब्रिगेडने टीका केलीय. आरक्षणाबाबत हाके यांच्या युक्तीवादावर टीका करताना संभाजी बिग्रेडने त्यांना इशारा दिलाय. लक्ष्मण हाकेंनी फालतू बडबड बंद करावी. हिम्मत असेल तर आरक्षणावर लाईव्ह चर्चा करावी, असं आव्हान संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिलंय.

मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसलेत. तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊन, नये अशी मागणी लक्ष्मण हाके करत आहेत. त्यासाठी ते वाडीगोद्रीत आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज आमनेसामने आलेत. हाके आणि जरांगे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. आता हा वाद आणखी वाढणार आहे. जरांगे आणि हाके यांच्या वादात संभाजी बिग्रेडने उडी घेतलीय.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी हाके यांना चर्चेला येण्याचं आव्हान दिलंय. हाके आरक्षणाची चुकीची, खोटी आणि असंवैधानिक माहिती देत असल्याचा आरोप भानुसे यांनी केलाय. मागील आंदोलनाच्यावेळी लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना दिलं होतं. हाके यांचे आव्हान आपण स्वीकारलं होतं. त्यावेळी मात्र हाके हे माध्यमांपासून दूर जात. चर्चेला आले नाहीत, असा दावा भानुसे यांनी केला.

काय म्हणाले भानुसे

लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेत माध्यमांसमोर वायफळ आणि फालतू बडबड करत आहेत. स्वतः विद्वान असल्याचा आणि आरक्षणाचा अभ्यास असल्याचा भास करून, आरक्षणाविषयी चुकीची, खोटी व असंवैधानिक माहिती देत आहेत. समाजाची दिशाभूल करीत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी स्फोटक वक्तव्य करीत आहेत. वास्तवात त्यांचा कुठलाही आरक्षणाचा सखोल अभ्यास नसताना त्यांनी मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे समर्थक किंवा आरक्षण अभ्यासक यांनी आरक्षणासंदर्भात लाईव्ह चर्चेला यावे असे काही महिन्यापूर्वी ओपन चॅलेंज दिले होते.

ते मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता व आरक्षणाचा अभ्यासक या नात्याने ते चॅलेंज स्वीकारलं होतं. पण त्यानंतर काही दिवस लक्ष्मण हाके आपलं पितळ उघडे पडेल या भीतीने प्रसार प्रसारमाध्यमातून गायब झाले होते. परत काही दिवसानंतर त्यांनी फालतू बडबड सुरू केली होती. तेव्हा पण त्यांचे दुसऱ्यांदा चॅलेंज स्वीकारून त्यांना लाईव्ह चर्चेसाठी चॅलेंज केलं होतं. तेव्हाही ते परत घाबरून प्रसारमाध्यमातून गायब झाले होते.

मुळात लक्ष्मण हाकेची कुवत व लायकी नसताना ते सुपारी घेऊन, स्वतःच्या स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी वाटेल तसे चुकीचे वक्तव्य करून समाजात तेड निर्माण करीत आहेत. त्यांना प्रसिद्धीची नशा चढली आहे. अशी माणसं समाजाला घातक असतात. आता ते वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. आणि वायफळ आणि फालतू बडबड करीत आहेत. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. आमचे त्यांना तिसऱ्यांदा चॅलेंज आहे की त्यांनी आरक्षणावर आमच्यासोबत लाईव्ह चर्चा करावी. जनतेलाही कळू द्या. खरं काय ?खोटं काय ? कोण चुकीच ? कोण बरोबर ? एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असं आव्हान भानुसे यांनी दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com