Manoj Jarange Patil Will Start Hunger Strike On 4 June For Maratha Reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aaraskhan News: ठरलं तर मग! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार, ठिकाण आणि तारीखही ठरली

Manoj Jarange Patil Declared Hunger Strike: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जरांगे पाटील संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर येथे आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांनी उपोषणाची घोषणा करत तारीख आणि ठिकाणाची माहिती दिली.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार बाहेर काढले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषणाची घोषणा करत राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या ४ जूनपासून ते उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण बेमदत असणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उपोषणाबाबत घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जरांगे पाटील संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर येथे आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांनी उपोषणाची घोषणा करत तारीख आणि ठिकाणाची माहिती दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'सगेसोयरेसाठी पुन्हा उपोषण आणि आंदोलन करणार आहे. ४ जून रोजी सकाळी ९ वाजता अंतरवाली येथे उपोषण सुरू करणार. तर ८ जून रोजी नारायण गडावर सभा घेणार आहे. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. ६ कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे.' तसंच, 'मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. १० टक्के आरक्षण दिले ते कुणाच्याही फायद्याचे नाही. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे.' असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पीएम मोदींवर निशाणा देखील साधला. त्यांनी सांगितले की, 'मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्हा जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या ४-५ जणांमुळे आली. आम्ही भाजपविरोधी नाही.' तसंच, 'सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार. जर सरकारने मान्य केले तर आम्ही राजकारणात पडणार नाही.', असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यासोबत, 'मला आता समाजाला आवाहन करण्याची गरज वाटत नाही. मराठा समाजाला आता सगळं काही माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेत आहेत. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करतील.' असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तसंच, 'लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा समाज नाही. आम्ही कुणाचाही प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचे आम्ही आवाहन केले नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचे आवाहन मी केले आणि कोणाला पाडायचे हे मराठा समाजाला चांगलेच माहिती आहे.', असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT