Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेला जाग, मुंबईतील १०२५ अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

Unauthorized Hoardings In Mumbai: पालिकेकडून घटनास्थळावर लावण्यात आलेले उर्वरित ३ अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई करत ते पाडण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे.
Unauthorized Hoardings In Mumbai
Unauthorized Hoardings In MumbaiSaam Tv

सचिन गाड, मुंबई

घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ७४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता मुंबई महानगर पालिकेला जाग आली आहे. पालिकेकडून घटनास्थळावर लावण्यात आलेले उर्वरित ३ अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई करत ते पाडण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक राजकीय पक्षांनी मुंबई महानगर पालिका आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील अनधिकृत होर्डिंगविरोधात करवाई करण्यास सुरूवात केली आहे. घटनास्थळावरून उर्वरित तीनही अनधिकृत होर्डिंगवर काही वेळातच कारवाई होणार आहे. या होर्डिंगचे सर्वेक्षण करून काही वेळातच ते पाडली जाणार आहेत. मुंबईत एकूण १०२५ अनधिकृत होर्डिंग आहेत. पालिका या सगळ्या होर्डिंग मालकांना नोटीस पाठवणार आहेत. त्यानंतर स्ट्रॅकचरल ऑडिट करून १० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर १७९ होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग मालकांना देखील पालिका नोटीस पाठवणार आहे.

Unauthorized Hoardings In Mumbai
Ghatkopar Hoarding News : घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी छगन भुजबळ यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. 'मृतांना पाच लाखांची मदत देऊन काय होतं? असा सवाल करत याप्रकरणी कठोर कारवाई करायला पाहिजे असे मत छगन भुजबळांनी व्यक्त केले. या घटनेत ठेकेदार यांचा मातोश्री संबंध समोर आलाय. तर याच्यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध असा सवाल छगन भुजबळ यांनी केलाय. तरी याप्रकरणी राजकारण न करता संबंधितावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Unauthorized Hoardings In Mumbai
Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळल्या प्रकरणी मोठी कारवाई; मालकाविरोधात गुन्हा दाखल, बीएमसीने ठोठावला कोट्यवधींचा दंड

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. हे होर्डिंग ज्या संबंधित कंपनीचे होते तिला मुंबई महानगरपालिकेने आधीच नोटीस बजावली होती. होर्डिंग लावण्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून हे होर्डिंग काढून टाका, असे नोटीसमध्ये म्हटले होते. तरीही त्या मालकाने काही ऐकलं नाही. मालकाचे नाव भावेश भिंडे आहे. हा भावेश भिंडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? संजय राऊत यांचा भाऊ सुनील साऊत याचा भावेशसोबत काय संबंध आहे?, असा सवाल नितेश राणेने केला आहे.

तसंच, 'भावेश भिंडेचे जे पार्टनर आहेत आणि ज्यांच्यामुळे निष्पाप मुंबईकरांना जीव गमवावा लागला. ते होर्डिंग वेळेत काढले असते तर ते सगळे मुंबईकर आज जीवंत असते. या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करा आणि अटक करा.', अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

Unauthorized Hoardings In Mumbai
Ghatkopar Hording Collapse: दुर्घटनास्थळीही नेत्यांचं राजकारण! घाटकोपर घटनास्थळी दोन भावी खासदार भिडले; VIDEO व्हायरल

दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा १४ वर पोहचला आङे. या घटनेमध्ये ७४ जण जखमी झाले आहेत. यामधील ४३ जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी अजूनही अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या एनडीआरएफ, अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Unauthorized Hoardings In Mumbai
Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग दुर्घटनेशी त्यांचा संबंध काय? भाजपने ठाकरेंचा फोटो एक्स-पोस्ट केल्यानंतर भुजबळांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com