घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डींगच्या अपघातात मोठी अपडेट आहे. होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये १३ मे रोजी दुपारी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोलपंपवरील होर्डिंग कोसळलं (Ghatkopar Hoarding Collapse) आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डींगच्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ७४ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. आता होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. या होर्डिंगच्या मालकाला ६ कोटी १३ लाख रूपये दंड देण्याची नोटीस मुंबई महाापालिकेने दिल्याची माहिती 'मिड डे'च्या हवाल्यानुसार मिळत आहे.
घाटकोपरमधील हे होर्डिंग आशियातील सर्वात मोठं होर्डिंग असल्याचा कंपनीने गूगलवर दावा केला होता. परंतु हे होर्डिंग कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आता या होर्डिंगच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल (Mumbai News) झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतकांच्या कुटुंबियांनी पाच लाख रूपये मदत देण्याची घोषणा देखील केली आहे. सुमारे १५० ते २०० जण या होर्डिंगखाली अडकले होते.
होर्डिंगवर कारवाईच्या सुचना
अपघात होऊन बारापेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरीही घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं (Ghatkopar Hoarding Collapse Case ) म्हटलं आहे. त्यांनी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसंच या होर्डिंगसंदर्भात चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. होर्डिंगचे स्पेशल आणि स्ट्रक्चर ऑडिट तसंच विना लायसन्स नसलेल्या होर्डिंगवर कारवाईच्या सुचना देखील दिल्या होत्या. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
राज्यसरकारची होर्डिंगबाबत नवी नियमावली
राज्यसरकारने २०२२ साली होर्डिंगबाबत नवी नियमावली तयार केली होती. होर्डिंगची उंची जमिनीपासून ४० फुटापेक्षा जास्त असू नये. होर्डिंगचा भाग रस्ता किवा पादचारी मार्गांवर असू नये. वाहनचालकाचं लक्ष विचलित होणार (Hoardings Rule) नाही. डोळ्यांवर प्रकाश येणार नाही, याची काळजी घेणे. सार्वजनिक मैदाने, उद्याने, क्रीडांगणे येथे हॉर्डिंगला परवानगी देता येत नाही. धार्मिक स्थळ, शासकीय भवन आणि पुलांवर हार्डिंग लावता येत नाही. एकावर एक, असे दोन होर्डिंग उभारता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.