Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: तोडगा न काढल्यास विधानसभेच्या रिंगणात उतरणार, देसाई -भुमरे यांच्या समोरच मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maratha Reservation Latest News: सगे-सोयरेच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची वेळ दिली आहे.

डॉ. माधव सावरगावे

'सगे-सोयरेच्या मुद्द्यावर तोडगा न काढल्यास विधानसभेच्या रिंगणात उतरणार', असा इशारा आज मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शुभराज देसाई, संदीपान भुमरे आणि इतर नेत्यांचा समावेश होता. यावेळी जरांगे यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना जरांगे पाटील म्हणाले की, ''सगे-सोयरेची व्याख्या आम्ही दिलेली असली पाहिजे. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्याख्या केली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, असे गिरीश महाजन यांनी याच व्यासपीठावर सांगितले होते.आता आधार मिळाला आहे.''

ते म्हणाले, ''हैदराबादचं गॅझेट लागू करावं. सातारा, मुंबई गॅजेट लागू करण्याचे सागितले. जे गुन्हे दाखल केले आहेत, ते आधी मागे घ्यावेत.'' जुन्या नोंदी शोधण्यासाठी समिती बनवण्यात आली आहे. याचबद्दल बोलताना जरांगे म्हणाले आहेत की, मुख्यंमत्री शिंदे यांनी समिती रद्द करू नये. त्यांना नोंदी शोधायला सांगितले पाहिजे. ज्या नोंदी सापडल्या आहेत ,त्यात काही अधिकारी जातीयवाद करून प्रमाणपत्र देत नाहीत. ते प्रमाणपत्र द्यायचे सांगा.'', अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, अधिकारी काम करीत नाही आणि सरकार बदनाम होत आहे. ३० जूनपर्यंत वेळ द्या, म्हणालेत, काय करायचे? जर एक महिन्यात आम्हाला दिले नाहीत, तर निवडणुकीत उतरणार म्हणजे उतरणारच, असंही यावेळी ते म्हणाले.

जरांगे म्हणाले, आम्ही इतका महिना वेळ देतो. त्यानंतर मात्र कोणीही म्हणायचे नाही, हे काय केले म्हणून. आमचा राजकारणचा मार्ग तुम्ही खुला करून देऊ नका. एक महिन्यात सगळेच्या सगळे विषय मार्गी लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT