Manoj Jarange Patil On Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh: कुणाचा बापही आला तरी...; बीडच्या देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange Patil: संतोष देशमुख हत्याप्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. आपण हे मॅटर दबू देणार नाही. न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचं जरांगे म्हणाले.

Bharat Jadhav

अक्षय शिंदे-पाटील, साम प्रतिनिधी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. उद्या ते परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वन परत भेट घेणार आहेत. तर उद्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या देखील कुटुंबांची जरांगे पाटील भेट घेणार आहे.कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरण दबू देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय.

त्याबरोबर 28 तारखेला बीड येथे होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. बीड येथील मस्साजोगला येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाने राजकारण तापलंय. देशमुख यांचे मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाहीये. याप्रकरणात त्या भागातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आलीय. परंतु याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव पुढे येत आहे.

या हत्याकांडाचे मास्टरमाईंड आहेत असा आरोप केला जात आहे. आता प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतलीय. जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी ते बीड येथील मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. याप्रकरणी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरण दबू देणार नाही, असं पाटील म्हणालेत.

तर 28 तारखेला बीड येथे होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. तसेच या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून केली जाणार आहे. यावरून बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, कारवाई केव्हा करणार? एवढे दिवस लागतात का मोबाईल तपासायला, असा सवाल जरांगेंनी केला.

बीड जिल्ह्यातील जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळेल,असंही जरांगे म्हणाले. सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रिपद, घ्यावं ,अशी मागणी केली होती. त्यावर जरांगे म्हणाले, मला राजकारणातून काही घेणं देणं नाही, पण संतोष देशमुख यांचा प्रकरण कोणाच्या जागीरदारीचा अवलादीचा बाप आला तरी दबू देणार नाही. हे मॅटर दबू देणार नाही. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

SCROLL FOR NEXT