
बीड : बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सरपंच हत्या प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांशी सत्ताधाऱ्यांसहित विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. या भेटीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान, आता नवनिर्वाचित महायुतीच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकांशी बोललो तेव्हा मलाही भीती वाटल्याची कबुली मंत्री शिरसाट यांनी दिली.
आज मंत्री संजय शिरसाट दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर शिरसाट म्हणाले, 'संतोष देशमुख प्रकरणात आणखी कोणाला तरी अटक झाली पाहिजे. परंतु एसपीने सांगितलं की, माझ्याकडे अधिकृत माहिती आली नाही. परंतु या हत्याकांडामध्ये आरोपी अटक केल्यानंतर गुप्तता पाळली जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला राजकारणामध्ये आणू नका. विरोधक आणि सत्ताधारी काय म्हणतात, त्यामध्ये रस नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. यात देशमुख यांच्या हत्येमध्ये ज्यांचा हात असेल तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे'.
'संतोष देशमुख प्रकराणातील सर्व बाजू तपासून यामध्ये ज्यांचा हात असेल त्यांना सरकार सोडणार नाही. मी येथे येण्यापूर्वी कोणाशीही चर्चा केली नाही. मला एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी पाठवलं आहे. त्यानुसार मी येथे आलो. मी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली आहे आणि येथे आलो आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि मंत्री उदय सामंत यांना स्पष्ट निर्देश दिले आहे की, वस्तुस्थिती जाणून घ्या. जी घटना काय घटना घडली, ती माहिती जाणून घ्या. कुटुंबाला भेट घ्या. त्यांना दिलासा देणे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो. परंतु या घटनेच्या खोलपर्यंत जायचं प्रयत्नाने करतोय. या घटनेची सर्व माहिती मी शिंदे साहेबांना देणार आहे'.
'अधिवेश संपताच आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही या प्रकरात माणुसकी या नात्याने आम्ही कर्तव्य समजून या ठिकाणी आलो आहोत. राजकारण म्हणून आलो नाही. आम्हाला संतोष यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यायचा आहे. आम्ही देशमुख कुटुंबाला असं वाऱ्यावर सोडणार नाही. शासनाची मदत मिळवून देणार आहोत. पक्षातर्फे देखील मदत करणार आहोत. उदय सामंत या ठिकाणी येणार आहेत. हा खंडणीचाच प्रकार आहे. दहशत माजवणे ज्याला म्हणतात, तशा पद्धतीने हे कृत्य केले आहे. जी काही दहशत आहे, ती फार भयानक आहे, असे ते पुढे म्हणाले.
'मी आता जेव्हा बीडमध्ये गेलो, तेव्हा काही लोक माझ्याशी बोलले. तेव्हा मला भीती वाटायला लागली. ही गोष्ट छोटी नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये ही दहशत सुरू आहे. सकाळी कॉलेजला जाणाऱ्या मुलांपासून ते संध्याकाळी रेतीमाफीया, दारूचे धंदे इथपर्यंत ही दहशत असून हे सर्व उघडून टाकायचे आहे, असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.