Manoj Jarange Patil on Walmik Karad and Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : वाल्मीक कराडच्या सुटकेवरून मनोज जरांगेंचा संताप, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन...'

Manoj Jarange Patil on Walmik Karad : वाल्मीक कराड रुग्णालयात उपचार घेत आहे. तुरुंगवारी टाळण्यासाठी त्याने हा बनाव केल्याचे बऱ्याच जणांनी म्हटले आहे. या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे.

Yash Shirke

Manoj Jarange Patil Statement : बीड न्यायालयाने वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र प्रकृती स्थिर नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने त्याला आयसीयूमध्ये भरती केले गेले. सलग ३-४ दिवसांपासून तो आयसीसमध्येच आहे. दरम्यान कोठडीची शिक्षा टाळण्यासाठी कराडने हा बनाव केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'वाल्मीक कराडला काहीही झालेलं नाही. सत्तेचा वापर करुन अधिकारी बाहेर पाठवले जात आहेत. दवाखान्यात नेऊन सोडण्याचं षडयंत्र सुरु आहे. आता सरकारने एक काम करावं. शिवाजीनगर पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. कराड दुसऱ्यांच्या फोनवरुन बोलते. गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला चादरी नेऊन दिल्या.'

या प्रकरणावरुन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरोपी सुटले, तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही. सर्वांची नार्को टेस्ट करा आणि केस अंडर ट्रायल चालवा' असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, 'सगळ्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विनंती करतो की, पोलीस अधिकारी, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा. त्याचे डॉक्टर दुखत नसताना दुखत असल्याचे सांगत आहेत. कराडला दुखत नसतानाही त्याला दवाखान्यात का ठेवलं? याची चौकशी करा. वाल्मीकला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांनी षडयंत्र केले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT