
बीडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मोठी घटना घडली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री दत्ता भरणे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घनटेप्रकरणी पोलिस तरुणाची चौकशी करण्यायेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री दत्तात्रय भरणे हे आज बीडमध्ये आहेत. बीडमध्ये दत्ता भरणे यांचा ताफा अडवत तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. दलितवस्ती सुधार योजनेच्या निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी या तरुणाने केली आहे. बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी अपहार केल्याचा आरोप केल जात आहे. नितीन मुजमुले या आंदोलकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला
बीडमध्ये ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बीडमधील मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. बीड शहरातील पोलिस मुख्यालयावर हा शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी पोलिस पथक, स्काऊट गाईड पथक, एनसीसी पथक यांनी पथसंचलन करत आन, बान अन् शान असणाऱ्या तिरंगा झेंड्याला मानवंदना देखील दिली. दरम्यान आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम देखील होत असून मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.