Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: साताऱ्याच्या सभेत मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, भाषणावेळी हात थरथरले, स्टेजवरच खाली बसले, VIDEO

Maratha Shantata Rally: भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील अचानक थांबले आणि खाली बसले. मिळालेल्या माहितीनुसार, अशक्तपणामुळे ते स्टेजवरच खाली बसले. त्यांनी भाषण थांबवले आणि खाली बसले होते.

साम टिव्ही ब्युरो

साताऱ्यात भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील अचानक थांबले आणि खाली बसले. मिळालेल्या माहितीनुसार, अशक्तपणामुळे ते स्टेजवरच खाली बसले. त्यांनी भाषण थांबवले आणि खाली बसले होते. त्यांचा हात थरथर कापत होते. त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे समजतेय.

मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते साताऱ्यात होते. भाषण करताना त्यांना चक्कर आली अन् ते खाली बसले. त्यांना नेमकं काय झालं. याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, त्यांना अशक्तपणा आला. भाषणादरम्यानही मनोज जरांगे यांनी आपल्याला बरे वाटत नसल्याचा उल्लेख केला होता. खाली बसल्यानंतर त्यांचा हात थरथर कापत असल्याचे व्हिडिओत दिसत होतं. सध्या त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेहण्यात आलेय.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होतं. उपचार घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. साताऱ्यात पोहचले तेव्हा त्यांची प्रकृती खालावल्याचं समोर आले. भाषणावेळी त्यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचा उल्लेख केला होता. भाषण संपल्यानंतर ते खाली बसले, त्यांचे हात थरथर कापत होते. त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

आज भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, ''मराठ्यांची आरक्षणाची लढाई साडेअकरा महिने सुरू आहे. ही लढाई कुण्या मोठ्या लोकांसाठी नाही, तर गरजवंत माराठ्यांसाठी आहे. हा लढा साडेअकरा महिने सुरु असून या देशात आत्तापर्यंत कुठलाच लढा सातत्याने चाललेला नाही आणि इतक्या लाखाने लोक त्यात सहभागी होत नाही, हा पाहिला लढा आहे.''

ते म्हणाले आहेत की, ''माझ्या कमरेत आणि अंगात चमक भरत आहे. या शेवटच्या उपोषणामुळे हाल झाले. पण मी माझ्या मराठ्यांना उघड पडून द्यायचं नाही म्हणून जीवाची बाजी लावून पुन्हा मैदानात उभा राहिलो आहे. मी कधी बाजूला हटतोय याची ते वाट बघत आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT