Raj Thackeray News : विधानसभा, आरक्षण, ठाकरे-पवारांना इशारा, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ९ महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray News : राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही केलाय. माझ्या नादी लागू नका, तुमच्याकडे प्रस्थापित असतील, माझ्याकडे विस्थापित आहेत, असा थेट इशाराच दिला
Maharashatra Elction:
Raj Thackeray vs Uddhav Thackeray saam Tv
Published On

Mns Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही केलाय. माझ्या नादी लागू नका, तुमच्याकडे प्रस्थापित असतील, माझ्याकडे विस्थापित आहेत, असा थेट इशाराच दिला. मनोज जरांगे यांच्या आडून ठाकरे आणि पवार विधानसभेच्या कामाला लागले आहेत, असा आरोपही यावेळी राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातील महत्वाचे ९ मुद्दे सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. पाहूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत ?

१) मी माझ्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा मराठवाड्यापासून सुरु केला, जो टप्पा मी आज छत्रपती संभाजीनगरला पूर्ण केला. मी माझा दौरा आवरता घेतला अशा बातम्या माध्यमांमध्ये वाचल्या. मी कुठला दौरा आवरता घेतला? मी माझ्या दौऱ्यातील गॅप्स कमी केल्या, काही ठिकाणी मुक्काम होता, तो मुक्काम न करता पुढच्या ठिकाणी पोहचलो आणि तिथे बैठका घेतल्या इतकंच.

२) सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो जे सगळ्यानी ऐकलं, पण त्याच्या नंतर ज्या बातम्या केल्या गेल्या त्या जाणीवपूर्वक होत्या म्हणजे राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा अशा वाट्टेल त्या बातम्या केल्या. मी २००६ ला पक्ष स्थापनेपासून सांगत आलो आहे की आरक्षण जे आहे ते आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. आणि त्याउपर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरंतर आरक्षणाची गरज नाही. कारण इथे रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत की त्या जर आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींना मिळतील असं बघितलं तर आरक्षणाची मग ते शिक्षण असो की नोकरी यांत आरक्षणाची गरजच पडणार नाही.

३) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्याना आरक्षण द्यावं पण आपल्याकडे जातींना आरक्षण दिलं जातं आणि मग स्वतःच्या राजकारणासाठी जातींचा वापर केला जातो. जरांगे पाटील यांचा खरंतर माझ्या दौऱ्याशी काहीच संबंध नव्हता, पण जरांगेच्या आंदोलनाचा वापर करून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी यांनी राजकारण केलं आणि यातला दुर्दैवाचा भाग म्हणजे मराठवाड्यातील काही पत्रकार ज्यांची नावं मला माहित आहे, त्यातल्या कोणी कशी काँट्रॅक्टस घेतली, कशा गाड्या घेतल्या हे सगळं मला माहित आहे. मी धाराशिवला असताना मला भेटायला लोकं आले होतं त्यांना भडकवायचं काम पत्रकरांनी केलं. मी जेंव्हा वर या म्हणलं तेंव्हा त्यांना खाली घेऊन जाणारे पत्रकार होते...

४) मग पुढे मी जेंव्हा निदर्शन करणाऱ्यांशी बोललो तेंव्हा त्यातल्या दोन जणांचे फोटो शरद पवारांसोबतचे होते. ते फोटो जुने होते असं त्यांचं म्हणणं आहे . तुतारीसोबतचे फोटो जुने कसे असतील? आणि २ जणं उद्धव ठाकरे गटाचे होते. परवा मी नांदेडला होतो तेंव्हा गेस्टहाऊसच्या बाहेर जे घोषणा देत होते त्यांचे फोटो पण शरद पवारांसोबतचे आहेत. काल बीडमध्ये जे झालं त्यात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता.

Maharashatra Elction:
Raj Thackeray : आरक्षणावर ठाम, उद्धव ठाकरे-शरद पवारांना इशारा, राज ठाकरे काय काय म्हणाले ?

५) लोकसभेच्या निकालांनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना वाटत आहे की त्यांना मराठवाड्यात भरघोस मतदान जे झालं ते या दोघांकडे बघून झालं, या दोघांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे जे मतदान झालं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातील मतदान झालं. मुस्लिम समाजाने देशभर मोदींच्या विरोधात मतदान इथे किंवा देशभर झालं किंवा दलित बांधवांना संविधान बदलणार असं वाटलं आणि त्यांनी मोदींच्या विरोधात जे मतदान केलं त्यातून हे घडलं आहे. आणि मी मागच्या पत्रकार परिषदेत बोललो तसं संविधान बदलणार हे भाजपचे काही लोकं बोलले आणि त्यातून नरेटिव्ह तयार झालं. आणि त्यांना विधानसभेला पण अशीच खेळी करावीशी वाटली.

६) काल निदर्शनं करणाऱ्या उद्धव गटाच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या लोकांनी चांगला चोप दिला आणि तो जाताना ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा. म्हणजे काय यांना जरांगेच्या आंदोलनाच्या आड स्वतःच विधानसभेचं राजकारण करायच आहे.

७) शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल... पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत.

८) शरद पवारांचं राजकारण जाती-जातीत द्वेष निर्माण करणं हेच आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुरु आहे.

९) यांनी माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या माझं जर मोहोळ उठलं ना तर याना एकही सभा घेता येणार नाही. यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. मी मागे म्हणलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्यामागे विस्थापित आहेत. माझी पोरं काय करतील यांना कळणार पण नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com