Raj Thackeray : आरक्षणावर ठाम, उद्धव ठाकरे-शरद पवारांना इशारा, राज ठाकरे काय काय म्हणाले ?

Raj Thackeray on sharad pawar and uddhav thackeray : राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप राज ठाकरेंनी केला.
Raj Thackeray
MNS Raj ThackeraySaam Tv
Published On

Raj Thackeray on Maratha reservation : सोलापूरमधून सुरुवात झालेल्या राज ठाकरेंच्या दौऱ्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आज समारोप झाला, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात आरक्षणाची (Maratha reservation) गरज नाही, असे विधान पुन्हा एकदा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केले. राज ठाकरेंनी पुन्हा एखदा आपण आलक्षणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केले.

सोलापूरमधील पत्रकार परिषदेनतर जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या गेल्या हे धक्कादायक होते. मराठा आरक्षणाला विरोध अशा बातम्या पसरवल्या गेल्या. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे. इथे बऱ्याच गोष्टी असल्यानं आरक्षण नकोय अशी भूमिका आहे, जर इथ असलेल्या साधनसंप्तीचा वापरली तर आरक्षणाची गरज नसेल, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

Raj Thackeray
Raj Thackeray: 'मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचे गंभीर आरोप

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर आरोप - Raj Thackeray on sharad pawar and uddhav thackeray

लोकसभेचा निर्णय झाला, त्यानंतर मराठवाड्यात आपल्याला मतदान झालेय. मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातील मतदान लोकसभेला झालं, ते तुम्हाला मिळालं होतं. त्यांच्या प्रेमामुळे मतदान झालेले नाही, असे राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी खडसावले.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत शब्द का नाही टाकला? मनोज जरांगेंच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरु आहे, हे समोर यायला पाहिजे. शरद पवारांसारखा अनुभवी माणूस महाराष्ट्रात मणिपूर होईल, असं वक्तव्य करत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. काल शिवसेनेचा जिल्हाप्रमुखाला खूप मार मार मारले, पोलीस मध्ये पडले बरे झाले. हे विधानसभा साठी सुरू आहे. पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांचे राजकारण पाहिले तर तुम्हाला समजेल. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं, हे शरद पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केल्यानंतर सुरु झालं, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Manoj Jarange Patil: मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका; जरांगे पाटील याचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

माझ्या नादी लागू नये, अन्यथा - raj thackeray warn uddhav thackeray and sharad pawar

या लोकांनी माझ्या नादी लागू नये. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. समाजात द्वेष निर्माण करुन कसलं राजकारण करत आहेत. फडणवीसांचा तुमचा विरोध असेल तर त्याबद्दल बोला. पण समजात तेढ कशाला निर्माण करता.

नेमकं घोडं कुठं आडलं?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा समजाचा मोर्चा निघाला होता. त्यामध्ये स्टेजवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेसचे आणि शिवसेनेचे नेते होते. सर्वांनी एखमुखांनी सांगितलं की मराठाला समाजाला आऱक्षण मिळायला हवं. जर सर्वांनी एकमुखांनी हे सांगितलं तर तुम्हाला आडवलं कुणी... सर्वांचं एकमत आहे तर आडवलं कुणी... मागील १५ वर्षांपासून मराठा समजाला आरक्षण का दिलं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com