Manoj Jarange Patil: मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका; जरांगे पाटील याचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil On Pankaja Munde: 'मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.', अशा स्पष्ट शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिले. बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
Maratha Reservation
Manoj Jarange Patil On Pankaja MundeSaam Tv
Published On

विनोद जिरे, बीड

'बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही.' असं म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या पंकजा मुंडे यांना त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले. 'मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.', अशा स्पष्ट शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिले. बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. 'विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिलाय. बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही.', अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता.

Maratha Reservation
Sharad Pawar Speech: गुरुजी किती वय झालं? भर सभेत शरद पवारांनी ९४ वर्षांच्या कार्यकर्त्याला थेट नावासह ओळखलं| VIDEO

पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर आजा मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी सांगितले की, 'पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी ऐकलले नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, समाजालाही नाही. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.' असे जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना सांगितले आहे. जरांगे पाटील या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

Maratha Reservation
Nagpur Loksabha Election 2024: जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क

पंकजा मुंडे यांनी बीड येथे झालेल्या मेळाव्यात 'मी इतके दिवस जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाबाबत बोलले नाही. मला जे काही बोलायचे ते डायरेक्ट बोलते.' असे स्पष्टपणे सांगितले होते. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर देत 'माझ्या वाटेला जाऊ नका.', असे खडसावून सांगितले आहे.

पंकजा मुंडे यांनी या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंना त्यांना त्यांच्या कर्तव्याची देखील आठवण करून दिली होती. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा शब्द दिलाय. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाने विधानसभेच्या सदस्याने ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा, कॅबिनेटमध्ये तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचे कर्तव्य आहे.', असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले होते.

Maratha Reservation
Salman Khan: सलमान खानला पुन्हा एकदा धमकी; लॉरेन्स बिश्नोईच्या नावे बुक केलेली कार गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com