Manoj Jarange Patil on Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: जरांगेंचा डाव, कुणावर घाव? विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे अर्ज मागवणार; सत्ता मिळवण्याची आखली रणनीती?

Girish Nikam

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी आता नवा डाव टाकण्याची रणनीती आखलीय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते हा नवा डाव टाकणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंनी आता थेट विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलीय.

त्यासाठी सर्व इच्छुकांना 27 ऑगस्टला हजर राहण्याचं आवाहन जरागेंनी केलंय. मराठ्यांच्या आरक्षणासाठी जरी जरांगेंनी हा डाव टाकण्याचा प्लॅन केला असला तरी त्यांनी विधानसभेसाठी इतर जातींसोबत मोट बांधून थेट सत्ता मिळवण्याची रणनीती आखलीय.

मनोज जरांगे पाटील यांनी थेट इच्छुकांचा डेटाच गोळा करायला सुरू केलीय. जरांगेंनी राज्यभरातल्या सर्व 288 मतदारसंघांमधल्या इच्छुकांची बैठकच बोलावलीय. एवढंच नव्हे तर सर्व जातीधर्मातल्या इच्छुक उमेदवारांचा निवडणुकीसाठी विचार करणार असल्याचं जरागेंनी सांगितलंय.

मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी उभारलेल्या आंदोलनाला 29 ऑगस्टला वर्ष पूर्ण होतंय. मात्र वर्षभरात जरांगेंनी आरक्षणासाठी अनेकदा उपोषणं आणि आंदोलनं केली. सरकारनं त्यांना आश्वासन देत आंदोलनं मागे घ्यायला लावली, मात्र कुणबी नोंदी शोधण्याशिवाय जरांगेंच्या आंदोलनाला अजूनही यश आलेलं नाही.

त्यामुळे आता वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर जरांगेंनी सरकारकडे मागणी करण्यापेक्षा थेट सरकारच स्थापन करण्याची रणनीती आखलीय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी हा डाव टाकलाच तर त्यांना किती यश येणार याबाबत सा-या राज्याला उत्सुकता लागलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT