Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 'छगन भुजबळ माझ्या नादाला लागू नको... सरकार कदरलंय'; लातूरमध्ये जरांगें पुन्हा कडाडले

Maratha Reservation/Maratha Reservation Janjagruti Shantata Rally : मनोज जरांगें पाटील यांनी सुरू केलेली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली लातूरमध्ये आहे. या रॅलीत जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली.

Sandeep Gawade

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू केलं, त्या दिवसांपासून छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. लोकसभा निवडणुकांआधी दोघांमध्ये चांगलीचं जुपली होती. आता मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीतही भुजबळांवर टीकेची झोड उठवली आहे. शांतता रॅली लातूरमध्ये असताना जरांगेंनी छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री बनवल्याचा आरोप केला आहे. भुजबळांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणी छगन भुजबळ यांनी एकदा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या घरी जाऊन बघावं, नेमकी काय परिस्थिती आहे. ओबीसींना आरक्षण असूनही छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. ओबीसीच्या लोकांना, नेत्यांना आरक्षण असूनही ते एक होत आहेत. तुम्ही संविधानीक पदावर आहे, त्यामुळे तुम्हाला याची जाण असायला हवी. त्यामुळे आता फक्त सगे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी प्रयत्न असतील. पण एकचही सरकारी नोंदी रद्द केली तर गाठ माझ्याशीही आहे.

एखाद्याच्या नावावर कुणबी नोंद सापडली तर त्याचं नोंदीनुसार दुसऱ्याला आरक्षण द्यावं. मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण मराठा समाजाचा व्यवसाय एकच आहे. गिरीश महाजन कितीही डाव टाका. मी आरक्षणातील बाप आहे. आणि हे लक्षात ठेवा जामनेरमध्ये एक लाख ३६ हजार कुणबी मराठे आहेत. अंतरवालीमध्ये भुजबळांनी रॅली काढायला लावली. छगन भुजबळ माझ्या नादाला नको. सरकार कदरलय. फडणवीस आणि अजित पवार यांच्या सागण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी बीडच्या रॅलीला परवानगी नाकारली. पण रॅली निघणारच, असा निर्धारही जरांगेंनी केला आहे.

रॅलीत भाषण सुरू असताना मनोज जरांगेंनी मुस्लिम समाजाच्या नमाजावेळी भाषण थांबवलं. स्वतःच्या जातीच बघायचं दुसऱ्याच्या जातीवर जाळ फेकायचा असे आपण नाही. सग्या सोयऱ्यांतून जर कोणी शिल्लक मराठा राहिलाच त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याला दिले जाणार, पण त्यातून एखादा जर हुकला कारण मला एकही मराठा बिगर आरक्षणाचा ठेवायचा नाही. याच्या आधारे मागेल त्या मराठ्यांना ककुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे. त्यावेळेला प्रचंड मोठं शिष्टमंडळ मंत्र्यांच होतं, त्यात चर्चा झाल्या मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

SCROLL FOR NEXT