ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सांस्कृतिक ओळख आणि वस्त्रांची राणी मानली जाणारी पैठणी साडी अनेकांना भुरळ घालत असते.
साड्यांच्या काठावर किंवा पदरावर मुनिया म्हणजेच लहान पोपटांची नक्षी विणलेली असते. ही डिझाईन खूप लोकप्रिय आहे.
आता लग्नसराई सुरू होणार आहे, त्यात जर तुम्हाला आकर्षक दिसायचं असेल तर पैठणी बेस्ट साड्या आहेत. या साड्याच्या पदरावर एक मोठा किंवा अनेक नक्षीदार मोरींची आकृती असते.
काही पैठण्यांमध्ये फुलांच्या वेली आणि पानांची नाजूक नक्षी असते. या साड्या साध्या वाटत असल्यातरी त्यामुळे तुमचा लूक आकर्षक होत असतो.
कड किंवा दुपदरी पैठणी साडी दोन्ही बाजूंनी सारखीच दिसत असते. साडीवरील विणकाम खूप उत्तमरित्या केलं जातं.
अस्सल पैठणी पूर्णपणे हातानं विणली जात असते. कमी खर्चात मिळणारी पैठणीत यंत्रांवर तयार होत असते.
खरी पैठणी साडी ही नैसर्गिक रंगाच्या रेशमापासून बनवलेली असते. या साडीच्या पदरावर मोर आणि फुलांची नक्षी खूप आकर्षत दिसत असते.
मशीन मेड पॉवरलूम पैठणीसाठी २५०० ते ८००० रूपये लागतात. सेमी पैठणी ८००० ते १८००० रूपयांपर्यंत मिळत असते. तर शुद्ध रेशमी हातमागाची पैठणी २० हजार ते ५० हजारांपर्यंत मिळत असते. शुद्ध हातमाग २ ते ६ महिन्यांच्या कालावधीत तयार होते. अशा साड्यांची किंमत ५० हजार ते २ लाख किंमत असते.