Sakshi Sunil Jadhav
जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य लोकांचा सहवास जितका गरजेचा आहे, तितकेच फसवे आणि स्वार्थी लोक ओळखणंही महत्त्वाचं आहे. चाणक्यांनी आपल्या नितीशास्त्रात याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केलं आहे.
चाणक्य सांगतात, ज्या महिला कायम स्वतःचं प्रमोशन करत राहतात आणि चपळाईने स्वतःला पुढे आणतात, त्यांच्यावर अंधविश्वास ठेवू नये.
खूप जास्त बोलणाऱ्या आणि विचार न करता बोलणाऱ्या महिलांचा स्वभाव पुढे अडचणी निर्माण करू शकतो, असे चाणक्य निती सांगते.
ज्या महिला बुद्धी, विचार आणि चारित्र्यापेक्षा केवळ बाह्य सौंदर्याला महत्त्व देतात, अशा महिलांचा सहवास टाळलेला बरा.
जो व्यक्ती तुमच्याविषयी इतरांकडे वाईट बोलतो किंवा चर्चा करतो, तो कधीच तुमचा सखा असू शकत नाही.
जो माणूस तुमच्याजवळ बसून इतरांची निंदा करतो, तोच माणूस तुमचीही निंदा करू शकतो. अशा लोकांशी नातं ठेवणं धोकादायक ठरू शकतं.
ज्या लोकांकडे संयम नाही, रागावर नियंत्रण नाही, ते क्षणिक भावनेत मोठे नुकसान करणारे निर्णय घेतात, असे चाणक्य सांगतात.
लहानसहान गोष्टींवर सतत वाद घालणाऱ्या व्यक्तींमध्ये समजूतदारपणा नसतो. अशा लोकांपासून नेहमी दोन हात दूर राहावे.
तुमच्या भावना समजून घेत नाहीत. त्यांना तुमच्या दुःख-सुखाशी काहीही देणंघेणं नसतं.