Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?

Maharashtra Politics: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येची सुपारी देणारा बडा नेता बीडच्या परळीतील असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार उघड

  • बीडच्या परळीतील एका बड्या नेत्याचा हत्येच्या कटात सहभाग

  • पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले

  • अमोल खुणे आणि दादा गरुड अशी संशयितांची नावे

बीडमधील एका बड्या नेत्याने मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या परळीमधील हा नेता असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. या कटामध्ये सहभागी असणाऱ्या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या एका जुन्या सहकाऱ्याचा देखील समावेश आहे.

बीडमध्ये मनोज जरांगेच्या हत्येचा कट रचण्यासाठी बैठका पार पडल्या. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचण्यात आल्यानंतर मराठा समन्वयकांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले असून जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी धनंजय देशमुखांसह जरांगे पाटलांचे अनेक सहकारी उपस्थित होते.

मनोज जरांगेंच्या हत्येसाठी कट रचण्यात आला होता. या कटामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा उल्लेख असून त्यासंदर्भातील व्हिडीओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे आहेत. जालना पोलिस ठाण्यात धाव घेत मनोज जरांगे आणि मराठा समन्वयकांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देत यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी जालना पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीमध्ये जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट दोन व्यक्ती रचत असल्याचे सांगितले. बीडमध्येच हा कट रचण्यासाठी बैठका झाल्या. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची पोलिस कसून चौकशी करत आहे या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Maharashtra Live News Update: भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

SCROLL FOR NEXT