Manoj Jarange Patil Lift Accident  saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा अपघात, लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानंतर काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Manoj Jarange Patil Lift Accident : एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील बीडमधील रुग्णालयात गेले होते. ते ज्या लिफ्टमध्ये होते, त्यात बिघाड झाला. यामुळे जरांगे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Yash Shirke

  • मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात

  • पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली लिफ्ट

  • लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते बीड शहरातील शिवाजीराव हार्ड केअर सोनोग्राफी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेट देण्यासाठी गेले होते. पण रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्टमध्ये बिघाड झाला. लिफ्ट थेट जमिनीवर आदळली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसह एका रुग्णाला भेटण्यासाठी बीड शहरामधील शिवाजीराव हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटलमध्ये त्यांनी लिफ्टचा वापर केला. तांत्रिक अडचणींमुळे लिफ्टमध्ये बिघाड झाला. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी ज्या लिफ्टमध्ये होते, ती लिफ्ट मध्येच अडकली.

आज (३ ऑगस्ट) दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. दुसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट थेट खालच्या मजल्यावर जाऊन आदळली. यात मनोज जरांगे पाटील यांना मुक्का मार लागल्याची माहिती समोर आली आहे. लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.

मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने मराठा समाजाने एल्गार पुकारला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वामध्ये २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला आधीपेक्षा जास्त संख्येने मराठा समाज सामील होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Scam : म्हाडामध्ये मोठा घोटाळा; मास्टरलिस्टमध्ये आढळली १५ बनावट नावे, गाळे बळकावले

Maharashtra Live News Update: जालना रोडवर चारचाकीचा भीषण अपघात

Uttarkashi Cloud burst: ढगफुटीचा कहर! उत्तराखंडमध्ये गावात पूराचा हाहाकार, अनेक घरे जमीनदोस्त|VIDEO

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये वारंवार का होतेय ढगफुटी? उत्तरकाशीमधील व्हिडिओ धडकी भरवणारा

Mumbai-Pune Tourism : वीकेंडला दूर नको; मुंबई-पुण्याजवळच प्लान करा ट्रिप, ५ स्वस्तात मस्त ठिकाणं

SCROLL FOR NEXT