Manoj Jarange Patil’s proposed Mumbai protest, the Maharashtra Home Department and police have reportedly prepared new guidelines saam tv
महाराष्ट्र

मनोज जरांगेंना आंदोलनाआधीच झटका; आझाद मैदानासाठी सरकारच्या जाचक अटी, काय आहे नियमावली?

Mumbai Protest Government New Rules : आता बातमी जरांगें पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनाची. जरांगे पाटलांनी मुंबईत धडकण्याचा इशारा दिल्यानंतर गृहखातं कामाला लागलंय. जरांगेंना रोखण्यासाठी पोलिसांनी नवी आणि कडक नियमावली आखलीय. काय आहेत नवे नियम? हे नियम जरांगे जुमानणार का? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

  • आझाद मैदानातील आंदोलनासाठी सरकार आणि पोलिसांकडून नवी नियमावली

  • प्रशासनाकडून कडक अटी लागू करण्याची तयारी आहे.

  • मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईतील आंदोलनाची पुढील दिशा महत्त्वाची

कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केलीय. यासाठी जरांगे थेट मुंबईत धडक देण्याच्या तयारीत आहेत. जरांगेंनी येत्या 29 ऑगस्टला हजारो मराठ्यांसह आंदोलनाचा इशारा दिलाय. यासाठी आझाद मैदानात कुच करणार आहेत. तर दुसरीकडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही 1 सप्टेंबरला मुंबईत महामोर्चा आयोजित केलाय. मात्र, या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसलाय. राज्याच्या गृह विभागानं मुंबईतील आंदोलनासंदर्भात नवे आदेश काढलेत.

आंदोलनाआधी आझाद मैदानावर नियमावली

दक्षिण मुंबईत मोर्चांना बंदी, केवळ आझाद मैदानातच आंदोलनाला परवानगी

आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी, सकाळी 9 ते 6 वेळ निश्चित

7 दिवस आधी आंदोलनासाठी अर्ज करणे अनिवार्य

आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी, जड वाहने, प्राणी आणण्यास सक्त मनाई

झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा जास्त लांब नसावी

आमरण उपोषण, आत्मदहन, अन्न शिजवण्यास बंदी

सरकारच्या नियमावलीनुसार, आता मराठा ओबीसी आंदोलकांना आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य कोणत्याही भागात आंदोलन करता येणार नाहीये. मात्र, मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय. गेल्या वेळी जरांगेंना सरकारनं आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली खरी मात्र जरांगे पाच दिवस ठाण मांडून बसले होते आणि सरकारची कमालीची अडचण झाली होती. त्यामुळे गृह खात्यानं यावेळी सावध भूमिका घेत नव्या अटी लागू केल्याचं दिसतंय. राज्य सरकारनं आंदोलनासाठी मुंबईत आझाद मैदान हे एकमेव अधिकृत ठिकाण घोषित केलंय. यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र जरांगे सरकारच्या अटी पाळणार की धुडकावणार? की त्याआधीच सरकार तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिनेता आमिर खानच्या भाच्याला मोठा झटका! आंदोलनात सहभागी होणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोडी! खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मोठा निर्णय होणार?

Fennel Seeds Milk Benefits For Back Pain: दुधात बडीशेप मिसळून पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, कंबरदुखी आणि थकवा होईल झटपट दूर

भाजपची मोठी कारवाई; ३ बड्या नेत्यांना ६ वर्षांसाठी केले निलंबित

Rice Cause Diabetes: भात खाल्ल्याने खरंच मधुमेह होतो? हे वाचा, सर्वात मोठा गैरसमज होईल दूर

SCROLL FOR NEXT