manoj jarange patil ends hunger strike manoj jarange patil fb account
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, या ४ मागण्या मान्य

Manoj Jarange Patil Hunger Strike : अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु होते. सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Yash Shirke

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. त्यांचे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाबाबत उपोषण सुरु होते. त्यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारकडून पूर्ण होणार असल्याच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

मराठा आरक्षणाबाबत विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु होते. आज (३० जानेवारी) राज्य सरकारने त्यांच्या एकूण मागण्यांपैकी चार मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आमदार सुरेश धस हे अंतरवाली सराटीला पोहोचले होते. त्यांनी सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना काही आश्वासने देण्यात आली. या आश्वासनांवर संमती दर्शवत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आता उपोषण करणार नाही तर थेट समोरासमोर लढाई होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना कोणती आश्वासने देण्यात आली?

१. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला एका वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु केली.

२. हैदराबाद गॅझेटचा शिंदे समितीकडून अहवाल घेतल्यानंतर उचित कारवाई करण्यात येईल.

३. मराठा आंदोलकांच्या विरोधातील गुन्हे (गंभीर स्वरुपाचे वगळून) उच्च न्यायाच्या निर्देशानुसार व शासनाच्या निर्णयानुसार तपासून मागे घेणार.

४. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर स्थापन झालेल्या कक्षामार्फत कार्यवाही करणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT