Pune News : पुण्यात पाणीप्रश्न पेटला, संतापलेल्या महिलांनी पालिकेत धडाधड हंडे फेकले, VIDEO

Shivsena UBT In Pune : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज पुण्यात हंडा मोर्चा काढण्यात आला. पाण्याची समस्या बिकट झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने ठाकरे गट आक्रमक झाला.
Pune Water Crisis Protest
Pune Water Crisis ProtestSaam Tv
Published On

Pune Water Supply Protest : पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील भवनी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. या ठिकाणी १५-१५ दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात हंडा मोर्चा काढला. तेथे संतप्त माहिलांनी कार्यालयावर पाण्याचे हंडे फेकल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील भवनी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला. अधिकाऱ्यांना निवेदन करुन, समक्ष भेटून ते दाद देत नाही. सर्व काही ठेकेदारांच्या नावावर ढकलतात असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला.

अधिकारी व ठेकेदार यांच्यातील वादामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाल्याचे शिवसैनिकांचे मत आहे. या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने हंडा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी हंडे फेकत संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा शिवसैनिकांनी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली.

Pune Water Crisis Protest
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, या ४ मागण्या मान्य

ठाकरे गटाचे शिवसैनिक क्षेत्रीय कार्यालयाच्या खाली बसले. कार्यालयातील अधिकारी आले. शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. शिवाय 'ठेकेदारांवर कारवाई करा, पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल असे लिहून द्या' अशी मागणी शिवसैनिकांनी केली. कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणे झाले असल्याची माहिती कार्यालयीन अधिकाऱ्यांनी दिली.

Pune Water Crisis Protest
Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्यात सापडला नवरा, २७ वर्षांपूर्वी झाला होता बेपत्ता; संन्यास घेऊन बनला अघोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com