Manoj Jarange Hunger Strike Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Manoj Jarange Hunger Strike: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती बिघडली असताना देखील त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी नकार दिला.

Priya More
  • मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस

  • मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

  • जरांगेंचा वैद्यकीय तपासणीला नकार

  • अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ येणार

योगेश काशिद, बीड

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती काही प्रमाणात खालावलेली दिसत आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आज सकाळी अंतरवाली सराटी येथे आले. पण मनोज जरांगेंनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला. पण काही वेळाने पुन्हा त्यांची तपासणी करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उपोषणामुळे जरांगे यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय पथकाकडून नियमित तपासणी केली जात आहे. मंगळवारी सकाळी डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. मात्र जरांगे यांनी तपासणी करण्यास नकार दिल्याने पथकाला तपासणी न करताच परत जावे लागले. काही वेळाने पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकुडे यांनी दिली.

उपोषणाचा चौथा दिवस असल्याने जरांगे यांच्या प्रकृतीकडे समर्थकांचे तसेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे. वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी यासाठी त्यांच्याकडे वारंवार विनंती केली जात आहे. पण ते वैद्यकीय तपासणी करण्यास नकार देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री मनोज जरांगेंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा प्रतिसाद मिळत आहे. अंतरवाली सराटी येथे समर्थकांची गर्दी वाढत असून सरकारने तातडीने चर्चा करून मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, उपोषणाला ४ दिवस उलटूनही सरकारकडून अद्याप अधिकृत शिष्टमंडळ चर्चेसाठी आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यरात्रीच्या भेटीमुळे प्रशासनाकडून जरांगे यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दुपारी सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ कधी दाखल होते? आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय भूमिका घेतली जाते? याकडे आता आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

गवतावर चालल्याने रक्तदाब सुधारतो का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT