Manoj Jarange Patil Criticizes News : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. राज्यातील पात्र महिलांना सरकारकडून दर महिना १५०० रूपये मानधन दिले जातात. विधानसभेआधी सरकरकडून सरसकट महिलांना १५०० रूपये देण्यात आले, पण आता पडतळाणी केली जाणार असल्याचे बोलले जातेय. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे माघार घेणार असल्याचे सांगण्यात येतेय. त्यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
बहिणींच्या मायेत सरकार दुरावा आणत आहे. लाडक्या बहिणींमध्ये भेदभाव करू नये. पैशासाठी हात मागे घेऊ नयेत. टिळा लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या. निवडून येताना सगळ्यांना पैसे द्यावे वाटत होते. आता लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. लाडक्या बहिणीमुळे सरकार जसे उघडे पडले, तसे आरक्षणात सरकारला उघडे करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही तर तुम्ही मराठा द्वेषाचे प्रचंड रोगीट हे उघड होणार आहे. तुम्ही मराठा विरोधी लोक आहात, हे जाहीर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात मराठ्यांच्या विरोधात राग असेल तर ते आरक्षण देणार नाहीत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
गोरगरीबांचे प्रश्न हे सरकार सोडवत नाही. जुलमी राजवट आडवी उभी कापून हे दिवस आणले. पण आयत्या गादीवर बसून सरकारकडून प्रश्न सुटत नाही. आम्ही फक्त न्याय मागतोय, तुमचे मुंडके कापून मागत नाही, तुमचा बळी मागत नाही. आम्ही साधं आरक्षण मागतोय. तरीही देत नसाल तर ही गरिबांची थट्टा आहे. यांच्या सत्तेवर उद्या लोक थुंकतील, असा हल्लाबोल मनोज जरांगे म्हणाले.
आमचं मत फक्त एवढंच आहे की,अन्यायकारक राजवट मोडली पण न्याय मिळवून देऊनही मग मराठ्यांनाच का न्याय मिळू दिला जात नाही. आरक्षणाची सुविधा मिळत नसेल तर तुम्ही कोणत्या आनंदात आणि लोकशाहीय जगता.? मुख्यमंत्र्यांची मराठ्यांविषयी भावना काय हे दूध का दूध पाणी का पाणी या आंदोलनातून होईल, असे मनोज जरांगे म्हणाले.
मी मुख्यमंत्र्यांना का बोलू नये.? आरक्षण दिलं किंवा नाही दिलं तरी उघड होणार आहे. खरा दोषी मी की सरकार हे देखील लोकांना आता कळणार आहे. जनता सुखी व्हावी म्हणून जुलमी राजवट काढून टाकली. वार आणि घाव आमच्या लोकांनी झेलले. आता ज्यांच्या हातात सत्ता दिली, ते जनतेला न्यायापासून दूर ठेवत असल्यानं त्यांच्यापेक्षा हे जास्त अन्यायी आहे का? असं आता वाटत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.