Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा मैदानात, उपोषणाचं अस्त्र उगारलं, फडणवीसांचं नाव घेत म्हणाले...

Manoj Jarange Patil hunger strike : सरकारला मराठ्यांच्या मागण्या माहिती आहे, सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्री मराठ्यांशी बेइमानी करणार नाही याची खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी जाणीव ठेवावी, असेही जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Saam Digital
Published On

Manoj Jarange Patil hunger strike for Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे अस्त्र उघारले आहे. अंतरवली सराटी येथे आजपासून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसण्याआधी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी बेइमानी करणार नाहीत, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उद्या 26 जानेवारी रोजी सगे सोयरे कायद्याच्या अधिसूचनेला एक वर्ष होत आहे. मराठा समाज 1 वर्षापासून रस्त्यावर झुंजतोय. 1 वर्ष लागतं सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायला. मराठा समाजाची जान सरकारला नाहीये, अशी टीका त्यांनी केली. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे. सगे सोयरे कायद्याची लगेच तातडीने अंमलबजावणी करावी. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी. आधी स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरू करावेत. काही जातीयवादी अधिकाऱ्यांनी नोंदी असलेले प्रमाणपत्र दिले नाही, ते प्रमाणपत्र तातडीने वितरित करावे. मराठा तरुणांवर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावे. सातारा संस्थान, बॉम्बे गवर्नमेंट, हैदराबाद संस्थानचे गॅझेट मुख्यमंत्र्यांनी तातडीने लागू करावेत. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला अजून निधी मिळालेला नाही, त्यांना निधी देऊन एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, असे जरांगे पाटील म्हणाले.

गुंडांची टोळीचा सरकारने नायनाट करावा

संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी. गुंडांची टोळीचा सरकारने नायनाट करावा. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी आपण लढणार आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारला मराठ्यांच्या मागण्या माहिती आहे, सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्री मराठ्यांशी बेइमानी करणार नाही याची खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी जाणीव ठेवावी, असेही जरांगे म्हणाले.

कोणताही विषय मागे राहणार नाही -

हे सामूहिक उपोषण आहे, ज्याला बसायचं त्याने बसावं. जोर जबरदस्ती कोणाला ही नाही. सरकारकडून कोणतीही विचारपूस नाही, काहीच बोलणं नाहीये. ही लढाई सुरू राहणार, कोणताही विषय मागे राहणार नाही. आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्हीच मग आता काही अडचण नाहीये. तुम्ही मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. तुमची मराठ्यांविषयीची भावना काय आता हे सगळं राज्य बघणार आहे.

मराठ्यांनी सत्तेत बसवलं -

ही लढाई सुरू राहणार, कोणताही विषय मागे राहणार नाही. आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्हीच मग आता काही अडचण नाहीये. तुम्ही मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. तुमची मराठ्यांविषयीची भावना काय आता हे सगळं राज्य बघणार आहे. खरे जातीयवादी कोण हे राज्याला समजलं. मुख्यमंत्र्यांच्या मनात मराठ्यांविषयी आकस, द्वेष असेल तर ते मराठ्यांना आरक्षण देणार नाही. मराठ्यांशिवाय सत्तेत बसू शकत नाही. मराठ्यांनी त्यांना सत्तेत बसवलं.

कोणाच्या मनात मराठ्यांविषयी विष पेरलं आहे हे आता आम्हाला बघायचं आहे, असे जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com