जरांगे-भुजबळ पुन्हा आमनेसामने, विधानसभेआधी ओबीसी-मराठा संघर्ष?
Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal  Saam TV
महाराष्ट्र

Bhujbal Vs Jarange Video: जरांगे-भुजबळ पुन्हा आमनेसामने, विधानसभेआधी ओबीसी-मराठा संघर्ष?

Tanmay Tillu

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी खंबीर भूमीका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. यातून आता पुन्हा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमने सामने आलेत. भुजबळांचं राजकीय करिअर संपवणार, त्यांना सोडणार नाही असा पणच जरांगे पाटलांनी केलाय.

तर काही झालं तरी ओबीसींच्या हक्कासाठी हा भुजबळ रस्त्यावर उतरेल मागे हटणार नाही असा जोरदार पलटवार भुजबळांनी केलाय. त्यामुळे भुजबळ विरूद्ध जरांगे यांच्यातले वाकयुद्ध रंगलंय.

एकीकडे हाकेंनी 54 लाख नोंदी रद्द करण्याची मागणी केली होती. तीच री ओढत भुजबळांनी खोट्या कुणबी दाखल्यांची देवाण-घेवाण केल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा दिला. तर एकाही नोंदीवर कारवाई झाली तर महागात पडेल असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलंय. तर भुजबळ जातीवाद करतात, अशी जोरदार टीकाही जरांगेंनी केलीये.

गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करणारे लक्ष्मण हाके आक्रमक होताच. दुसरीकडे जरांगेंनीही मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल मात्र मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ आहेत. त्यामुळे भुजबळांना सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला छगन भुजबळांनी केराची टोपली दाखवली आहे. 'भुजबळांचं राजकीय करिअर संपवणार', असं जरांगे म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले की, ''मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय,आमदारकी काय चीज.''

त्यानंतर पुन्हा जरांगेंनी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशा शब्दात भुजबळांना डिवचलं.लोकसभेत पडलेले सगळे एकत्र आले म्हणून जास्त खूश होऊ नका... मराठा आरक्षणाला विरोध करणं बंद करा.. कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्या दिवसात कळेल असही जरांगेंनी म्हंटलं..त्यावर भुजबळांनीही पलटवार केला.

एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण या कचाट्यात सरकार सापडलंय..लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला. आता विधानसभा निवडणुका आहे. त्यामुळे यातून योग्य तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार एवढं नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: वारीचा आनंद गगनात मावेना, पालखीसमोर भरतनाट्य!

VIDEO: ग्रामस्थांना आरेरावी करणाऱ्या तलाठ्याची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

Maharashtra Live News Updates : १५०० रुपये देण्यापेक्षा रोजगार द्या : रोहित पवार

Rahul Dravid: टीम इंडियाला कोचिंग दिल्यानंतर या 3 संघांची राहुल द्रविडवर नजर; मिळू शकते मोठी ऑफर

Sangli च्या पलूसमध्ये पोषण आहारात मृत सापाचं पिल्लू; 'साम'च्या बातमीची प्रशासनाकडून दखल!

SCROLL FOR NEXT