VIDEO: लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
CM Eknath Shinde On Laxman HakeSaam Tv

VIDEO: लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

CM Eknath Shinde On Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण आहे यांनी तब्बल दहा दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. यावरच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

गेल्या दहा दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी अखेर स्थगित केलं आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मात्र उपोषण स्थगित करताना ते म्हणाले आहेत की, आमचे उपोषण आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत. दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मण हाके यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''काल ओबीसी शिष्टमंडळासोबत आमची बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्री, इतर मंत्री सगळे होते. यावेळी चांगली चर्चा झाली. कुठल्याही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा, ओबीसी समाज आणि कोणावरही अन्याय होऊ नये, यावर आमची चर्चा झाली.''

VIDEO: लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
Laxman Hake Video: सर्वात मोठी बातमी! १० दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; शिष्टमंडळाच्या भेटीनंतर घोषणा

मुख्यमंत्री म्हणाले, ''या बैठकीत अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलं आहे. यातच आज त्यांनी (लक्ष्मण हाके) शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो.''

दरम्यान, लक्षण हाके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना मी भेटले होते. त्यांच्या तब्बेतेची चौकशी मी वेळोवेळी करत होते. काल आमची बैठक झाली. बैठकीत आम्ही आमचे विचार मांडले. शष्टमंडळाला आज पाठवण्यात आलं. चांगली गोष्ट आहे की, सरकारने दखल घेतली. सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल. या विषयाने आंदोलन स्थगित केलं असेल.''

VIDEO: लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी CM शिंदे मैदानात! अजित पवारांना शह देण्यासाठी मोर्चेबांधणी; दिवसभर बैठकांचा धडाका

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ''त्यांच्या मागण्या न्याय आहेत.'' मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्या म्हणाल्या की, ''लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणात मला आदर आहे. त्यांची भाषा विचार यात त्यांनी कोणाला ललकारले नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून एक आदर वाटतो. बाकी कोण काय बोलतो यावर बोलायची गरज नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com